18 एप्रिल दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना
प्रभु तेरो नाम जो ध्याये फल पाये सुख लाये...
श्लोक
- अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते । जननी जन्मभूमिश्च स्वर्गदपि गरीयसी ।। जय राम लक्ष्मणाला म्हणतो
- हे लक्ष्मणा, ही लंका सोन्याची असली तरी मला आवडत नाही. आपल्याला जन्म देणारी आई आणि जन्मभूमि या दोन गोष्टी स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहेत.
→ चिंतन
अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभिमानी व स्वावलंबी असले पाहिजे. माणसामधला असा स्वाभिमान केव्हा झोपलेला असतो तेव्हा माणूस पारतंत्र्यात, परावलंबनात आनंद, सुख मानीत असतो आणि जे जसे आहे ते तसे पत्करतो. आपल्याला बुद्धी, मन आहे. या जगात आनंद लुटण्याचा, उपभोगण्याचा हक्क आपल्यालाही आहे हे अशा माणसांच्या ध्यानीमनीही राहात नाही. आपण आपल्या भारतीय इतिहासाचा विचार केला तर आपल्याला या प्रश्नाचे उत्तर शोधता येईल की आपणावर अनेक परकीय लोकांनी सत्ता का गाजविली. म्हणूनच पुन्हा परकीय सत्तेखाली जायचे नसेल तर स्वतंत्र भारताच्या प्रत्येक नागरिकाने स्वाभिमान आणि स्वावलंबन सोडता कामा नये.
कथाकथन
- 'दारू करते सत्यानाश': दारूचे दुष्परिणाम फार प्राचीन काळातही पडलेले आहेत. सुरांनी असुरांना सुरा पासून अमृत फळविले. संजीवनी मंत्र साध्य असूनही दैत्यांचा गुरू शुक्राचार्य दैत्यांना देवांवर जय मिळवून देऊ शकला नाही ते या व्यसनापायी. यादवांच्या थोर, शूर घराण्याचा झाला तो मद्यामुळेच इतिहासकालातही या दारूने वेळोवेळी आपल्या सीता दाखविल्या आहेत. इंग्रजांच्या अमलात मद्याला प्रतिष्ठा लाभली. राज्यकर्ते थंड देशातील त्यामुळे त्यांना मद्याची सवय आणि आम्ही गुलाम प्रजाजनांनी त्यांचे केवळ अनुकरण केले. लोकमान्य टिळकांनी तेव्हाच | आपल्या लोकांना महाभयानक व्यसनापासून दूर राहण्याचा इशारा दिला होता. महात्माजींना तर दारूबंदीसाठी अनेकविध यत्न केले. दुकानांवर सवयंसेवकांच्या साहाय्याने त्यांनी मद्यपान विरोधी निदर्शनेही केली. तरीपण त्याचा व्हावा तसा परिणाम झालेला नाही. आज गोरगरिब दारू पितात ते म्हणे कष्ट हलके करण्यासाठी. दुःख विसरण्यासाठी आणि नंतर सवय झाली म्हणून व्यसनाधिनता एवढी वाढते की, त्यांच्यातील माणूसच हरवून बसतो; मग बायकामुलांची उपासमार करून, प्रसंगी त्यांना मारझोड करूनही ते दारु पितात. दारुमुळे त्यांना नाना रोग, व्याधी जडतात. दारुच्या आधीन गेलेल्या माणसाचा विवेक संपतो. त्याला फक्त मद्य प्यावयास हवे असते. मग आपण पितो आहोत ते काय आहे तो विचार करीत नाही. कित्येकदा त्यात विषारी द्रव मिसळल्याने शेकड्यांनी माणसे मरतात वा अंध व अपंग होतात. तरीपण दारुडो उपडत नाहीत. कित्येकदा मद्य घेऊन त्या धुंदित वाहन चालविल्याने मोठमोठे भीषण अपघातही होतात. ही झाली अशिक्षितांची, श्रमिकांची कथा; स्वतःला उच्चभ्रू समजणाऱ्या लोकांच्यात तर आज मद्यपान ही फॅशनच झाली आहे; प्रतिष्ठितपणाचे ते एक अविभाज्य लक्षण मानले आहे. काही ना काही निमित्ताने या अशा 'ओल्या पाटर्चा' आयोजित केल्या जातात. महत्वाच्या सभांच्या ठिकाणी तर मद्यपान हे आवश्यकच मानले जाते.. आणखी एक वर्ग असा आहे की, तो मद्यप्राशन करण्याची आपल्याला सनदच आहे. असे मानतो. हा वर्ग म्हणजे कलावंताचा वर्ग, काही उत्कृष्ठ गायक, अभिनेते हे मद्याशी मैत्री करतात व आपले आणि आपल्या कलेचे अकाली मरण ओढवून घेतात. असे हे मद्य सत्यानाश करणारे जालिम विष आहे. मुलांनो यापासून सावध रहा.
सुविचार
• मद्य हे सत्यानाश करणारे विष आहे; यापासून दूर रहा व शिक्षण हे अमृत आहे ते पिऊन यशस्वी जीवन जगा. • दारूच्या आधीन झालेला माणसाचा विवेक संपतो.
→ दिनविशेष
• तात्या टोपे स्मृतिदिन १८५११८५७ सालच्या स्वातंत्र्यसंग्रामात लढणारे हे हापूरच्या पराभवानंतर त्यांची युद्धकुशलता दिसून आलो. विस्कळीत होऊन गेलेल्या आपल्या सैन्यात्यां वोड्याच अवधीत त्यांनी पायदळ, घोडदळ व तोफखाना आपल्या ताब्यात घेऊन गनिमी काव्याने देशांशी युद्ध बुद्धकौशल्यत्वाच्या प्रत्ययाला आणून दिले. एका लढाईत कानपूर येथे इंग्रज सेनापती कॉलिन त्यांचा तरी त्यांच्या हाती पडले. गंगेवरील पूल उडवून तात्यांनी इंग्रजांचा गंगापार होण्याचा मार्ग बंद करून टाकला तरीही चालून त्यांनी आपल्या सैन्याची वारंवार नवनवीन रचना करण्याचा प्रयत्न केला. १८५९ रोजी शिघ्री येथे त्यांचा मृत्यू झाला.
• मूल्ये
• स्वदेशनिष्ठा, देशभक्ती, स्वातंत्र्यप्रेम + अन्य घटना
• महर्षि धोंडो केशव कर्वे यांचा जन्म १८५८
• क्रांतिकारक दामोदर हरी चाफेकर यांना फाशी- १८९८.
• जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांचे निधन - १९५५
• जागतिक वारसा दिन. उपक्रम -
• १८५७ सालच्या स्वातंत्र्यसमरातील काही रोमहर्षक प्रसंगांचे कथन करणे.
→ समूहगान
• नन्हा मुन्ना राही है, देश का सिपाही हूँ...
→ सामान्यज्ञान
• औद्योगिक क्रांती - १८ व्या शतकाच्या शेवटी युरोपमध्ये झाली.
• रशियन क्रांती १९१० रशि सेक्ट
• फ्रेंच राज्यक्रांती - १७८९ से १७९१
• अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध - १७७५ से १७८३.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा