Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, १ एप्रिल, २०२४

2 एप्रिल दैनंदिन शालेय परिपाठ

            2 एप्रिल दैनंदिन शालेय परिपाठ



→ प्रार्थना

 आई माझा गुरू, आई कल्पतरू, सुखाचा सागरू आई माझी... 

 

→ श्लोक

उपकारोऽपि नीचानामपकारो हि जायते । पयः पानं भुजङ्गानां केवल विषवर्धनम् । 

दुष्ट माणसावर केलेला उपकारसुद्धा अपकार ठरतो. सापांना दूध पाजले तरी केवळ विषाचीच वाढ होते. -


- चिंतन 

- - कार्याचे स्वरूप, कर्त्याचे शहाणपण व हिंमत, साधनांचा योग्यायोग्यपणा यावर मुख्यतः कामाचे यश किंवा अपयश अवलंबून असते. प्रयत्नांची पराकाष्ठाही करावयास हवी. सतत पडणाऱ्या पाण्याचे धारेने कठीण असा खडकही फुटतो. यशाच्या प्राप्तीसाठी सतत प्रयत्न करणे असते. शिवाजी महाराजांनी आग्राहून सुटका करून घेतली, ते यश म्हणजे कर्त्यांचे शहाणपण, साधनांचा योग्य उपयोग याचे


कथाकथन -

 'कपिलदेवाची क्रिकेट साधना' भारतातील सर्वश्रेष्ठ अष्टपैलू क्रिकेटपटू बनलेला कपिलदेव याने अनेक जागतिक विक्रम मोडून | आपले विक्रम प्रस्थापित केले. वेगवान गोलंदाज म्हणून त्याने आपल्या कारकीर्दीस सुरुवात केली. त्यासाठी त्याने वेढलेकीचा वेग तर वाढवलाच, पण आदबरोबर चेंडू आत किंवा बाहेर वळवावेत कसे, हे कौशल्य संपादनासाठी अनेक वेगवान बॉलर्सच्या शैलीचे निरीक्षण केले व ते कौशल्य संपादन केले. अनेक अशा गोलंदाजांचे मार्गदर्शन प्राप्त केले. त्यासाठी भरपूर सराव केला. चेंडू धरावा कसा, फेकावा कसा, त्या वेळी शरीराची अवस्था कशी असावी, आसूड टप्याचा चेंडू टाकून फलंदाजाला गोंधळून कसं टाकावे, यासाठी अथक परिश्रम करून कौशल्य हस्तगत केले. आपली शारीरिक क्षमता टिकून राहावी, म्हणून सतत विविध प्रकारचे व्यायाम तो घेत राहिला. त्यामुळे तो अधिक गोलंदाजी करू शकत होता. यासाठी आपली दमछाक होऊ नये म्हणून खबरदारी घेतली. आपलं मन सतत क्रिकेटच्या खेळातच रमवल. बॉलिंग बरोबर उत्तम फटकेबाज फलंदाजी कशी करावी याची दीक्षा घेतली व त्यासाठी अनेक प्रयोग करून तो चांगला फटकेबाज फलंदाजही बनला आणि क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचे करता यावे म्हणून आपल्या अंगी चापल्य, चेंडूचा नेमका अंदाज घेण्याची कुवत आणि चेंडू पकडून तो यष्टिरक्षकाकडे फेकण्याची कलाही साध्य केली. डोकं शांत वून गोलंदाजी व फलंदाजी करण्यासाठी मनावर ताबा मिळविण्याची मानसिक शक्ती प्राप्त करून घेतली. मनाचा निश्चय करून जागतिक फलंदाजीत एकदिवसीय एका सामन्यात दोनशेच्या वर धावा काढून अपयशाचं रूपांतर विजयात करण्याचा कणखरपणा प्राप्त केला. ही त्याची शारीरिक, मानसिक व बौद्धिक साधनाच त्याला जगातील उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून बनवू शकली. आता सांगा साधना करायची नणजे काय करायचं ते? एक चुणचुणीत मुलगा म्हणाला, "गुरुजी साधना म्हणजे शारीरिक अवयवांवर नियंत्रण मिळवून त्याचा उपयोग ध्येयसिद्धीसाठी रून घेणे आणि ते ध्येयसिद्धीसाठीच वापरत राहणे म्हणजे साधना होय." कमळे गुरुजी म्हणाले, “योग्य असा अर्थ सांगितलास साधनेचा. अशी साधना तुम्ही आपल्या ध्येयप्राप्तीसाठी वापरणे. तसेच मानसिक तोल साधून भावनांचा उद्रेक वा मरगळ टाकून सर्व मानसिक भावना ध्येयप्राप्तीसाठी वापरणे आणि बुद्धीने ध्येयसिद्धीसाठी योग्य विचार करून ते विचार ध्येयसिद्धीसाठीच सतत करीत रहा.' 


+ सुविचार 

+ • आयुष्यातील बिकट प्रसंगांना तोंड देण्याची तालीम म्हणजे खेळ.


दिनविशेष - 

• क्रिकेटपटू रणजी स्मृतिदिन (रणजितसिंहजी) १९३३ - हे थोर भारतीय क्रिकेटपटू होते. नवजांचे ते वारस होते. त्यांचा जन्म जामनगरजवळच्या सरोदर या खेडेगावात १०-९-१८८२ रोजी झाला. शिक्षणरंभीच क्रिकेटविषयी त्यांना गोडीच्या प्राचार्यांनी रणजींचे उपजत क्रीडागुण हेरले. त्यांचेच त्यांना मार्गदर्शन लाभले. लवकरच ते फलंदाजीत व विशेषतः फटकेबाजीत पारंगत झाले. ते शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी अपार कष्ट घेऊन आपल्या खेळात खूप सुधारणा व प्रगती घडवून आणली. आपण मोठे क्रिकेटपटू व्हावे" अशी महत्त्वाकांक्षा त्यांच्या मनात निर्माण झाली. १८९५ सालापासून रणर्जीचे क्रिकेटमधील खरे तेज लोकांना दिसू लागले. त्याच साली संसेक्स परगणा संघात त्यांचा सन्मानपूर्वक अंतर्भाव झाला. भारतीय खेळाडू परगणा संघातून खेळण्याच्या योग्यतेचे नसतात. हा इंग्रजांचा समज रणजींनी आपल्या खेळाने चुकीचा ठरविला. पहिल्याच सामन्यात त्यांनी लॉर्डसचे मैदान गाजविले. त्यानंतर त्यांच्या शतकांचा जोरदार धडाका सुरू झाला. त्या वेळेपासूनच त्यांचे नाव मान्यवर फलांदाजांच्या नामावलीत समाविष्ट झाले. एकाच महिन्यात एक हजार धावा पूर्ण करण्याचा पराक्रम त्यांनी आपल्या कारकीर्दीत तीन वेळा केला. रणजी हे 'ग्लान्स' फटक्याबद्दल प्रख्यात होते. तसेच त्यांचा 'हूक' चा फटकाही अप्रतिम होता. त्यांचे फटके बघण्यासाठी प्रेक्षक अतोनात गर्दी करत. भारतात जन्मलेले व इंग्लंडतर्फे खेळणारे तेच पहिले भारतीय खेळाडू होते. 'रणजी' हे एका छोट्या संस्थानचे राजकुमार असले तरी खेळाच्या साम्राज्यातील सम्राट आहेत. असे गौरवोद्गार त्यांच्याबद्दल ए.जी. गार्डनर या सुप्रसिद्ध इंग्लिश लेखकाने काढलेले आहेत. जामनगर येथे त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारतातील राष्ट्रीय विजेतेपदाच्या क्रिकेट स्पर्धेला रणर्जीचे नाव देण्यात आलेले आहे. 


•  मूल्ये

   • खिलाडूवृत्ती, ध्येयनिष्ठा


अन्य घटना 

• बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचे निधन - १७२०. 

• जगप्रसिद्ध पहिलवान युजेन सैंडी यांचा जन्म १८६०.

 • राजर्षी शाहू महाराज राज्यरोहण दिन - १८९४. 

 • केशवराव जेधे जन्मदिन - १८९६, 

 • दलाई लामांचे भारतात आश्रयार्थं आगमन - १९५९.

 •  इनडामध्ये जगात सर्वात जास्त उंचीचा म्हणजे ५५५.३५ मी. चा टॉवर बांधून पूर्ण झाला 

  

 उपक्रम +

१९७५ • आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंची माहिती वा क्रिकेटपटूंची चित्रे संग्रहित करण्यास सांगणे.


समूहगान

• सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा.....


 सामान्यज्ञान


प्रमुख राष्ट्रे-राष्ट्रीय खेळ

 भारत-हॉकी

• ऑस्ट्रेलिया-क्रिकेट

  • जपान ● - ज्युजत्सू (कुस्तीचा एक प्रकार)

• अमेरिका-बेसबॉल

 • ब्राझील -टेबल टेनिस (पिंगपाँग)

• चीन -फुटबॉल

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉सरळ सेवा भरती ।। General knowledge

👉 आधुनिक शेतीविषयक माहिती

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा

*****************************************************************************

🛑  *संपूर्ण अभ्यास* 🛑

*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1

🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*

https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1

📕📗📘📙📕📗📘📙

*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1

✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1

*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1

*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1

*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1

✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1

*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1

*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1

*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1

*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1

■■■■■■■■■■◆◆◆◆◆■■■■■■■■

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 


👉शैक्षणिक बातम्यासाठी येथे क्लिक करा

👉आधुनिक शेतीविषयक माहिती

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा
👉 टेलिग्राम ग्रुप जॉइन करा


.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा