21 एप्रिल दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना
प्रार्थना देवा तुला, मिटू दे रामना...
→ श्लोक
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता । या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।। या ब्रम्हाच्युतशंकरप्रभृतिर्देवैः सदा वन्दिता । सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ।।
घवलवणांची शुभवले पण करणारी, वीणा हाव सुंदर दंड हाती धरणारी, स्वेत कमलांत बसलेली, ब्रम्हाविष्णुशंकरादिदेवांनी वंदिलेली, श्रीसरस्वती, माझे जडत्व नाशून, माझे रक्षण करो. कहफुले, चंद्र, हिम, हार यांसम
→ चिंतन
मोठे कवी व महान तत्त्वज्ञ हे कोणत्याही देशात जन्मले असले तरी ते सर्व जगाचे उपकर्ते ठरतात. पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांतील लोकार आपलेसेच वाटतात. वाल्मीकी ऋषींचे रामायण हे महाकाव्य सर्व जगात मान्यता पावलेले आहे. रामायणावर आधारित अशी अनेक काव्य व ख पूर्वेकडील राष्ट्रात मलाया, बाली, इ. देशात निर्माण झाली आहेत. संस्कृत कवी कालिदास यांचे 'शाकुंतल' नाटक वाचून गटेसारखा श्रेष्ठ जर्मन अर्य तो नाट्यग्रंथ मस्तकावर घेऊन नाचला. शेक्स पेअर, मिल्टन यांच्यासारखे साहित्यिक पृथ्वीवरील सर्व लोकांना आपलेसे करतात.
कथाकथन
- 'छत्रपती शिवाजी' ज्याचं ज्याचं या भारतावर व भारतीय संस्कृतीवर प्रेम आहे, अशा प्रत्येकाचं श्रध्दास्थान व स्फूर्तीस्थान असलेल्या शिवाजीचा इतिहास आहे. जवळजवळ साडेतीनशे वर्षांच्या त्या काळ्याकुट्ट कालखंडात धर्मवेड्या अशा परधर्मीय राज्यकत्यांन व त्यांच्या हस्तकांनी इथल्या जनतेवर केलेल्या अत्याचारांची ती भयानक चित्रे मनःचक्षूंसमोरून सरकू लागली की आजही अंगावर काटा उभा राहतो. अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, दिल्लीची मोगलशाही, गोव्याची पोर्तुगीजशाही आणि जंजिऱ्याची सिद्धीशाही अशा चार-पाच जुलमी राजवटीखाली एकंदर जनता चिरडली-भरडली जात होती. देवळे पाडली जात होती, मूर्ती फोडल्या जात होत्या बाटवाबाटवी शिगेला पोहोचली होती, लोकांची लुटालूट करून गावेच्या गावे बेचिराख केली जात होती आणि स्त्रियांवर केल्या जाणान्या | अत्याचारांना तर सीमाच उरली नव्हती. पण आपल्या धर्माच्या व संस्कृतीच्या बंधु-भगिनींवर असे पाशवी अत्याचार चालू असतानाही त्या वेळचे शूर, बुध्दिमान पण स्वत्व हरवून बसलेले बरेचसे शायांच्या सरदारक्या स्वीकारण्यात व त्यांची राज्ये दृढमूल करण्यात भूषण मानीत होते ! याला एकच ज्वलंत अपवाद निपाला तो म्हणजे शिवनेरीवर जिजामातेच्या उदरी सन १६३० (१९ फेब्रुवारी) मध्ये जन्माला आलेला शिवबा. या शिवबाने वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन, त्याच्या साक्षीने आपल्या सवंगड्यांना सांगितले, “यापुढे हे अत्याचार कायमचे थांबविण्यासाठी स्वराज्य स्थापन केलं पाहिजे, ही श्रींची इच्छा आहे. तेव्हा स्वराज्य स्थापनेसाठी यापुढं आपण जिवाचं रान केलं पाहिजे' शिवरायांचा हा तेजस्वी | संदेश ऐकून त्यांच्या सहकाऱ्यांच्या अंगात वीरश्रीचे वारे संचारले. म्हणूनच वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी शिवरायांनी तोरणागड घेतला आणि त्यानंतर शत्रूंचे गडांमागून गड व प्रदेशांमागून प्रदेश जिंकून, त्यांनी स्वराज्याचा केवढातरी विस्तार केला. या झंझावती वीराला मारण्यासाठी | पैजेचा विडा उचलून विजापूरहून आलेला आवाढव्य अफझलखान हाच त्या वीराच्या बिचव्याला बळी पडला. मोगलांतर्फे पुण्यास आलेला शाहिस्तेखान एका हाताची बोटे गमावून दिल्लीस परत गेला आणि कपटी औरगंजेबाने या वीरश्रेष्ठाला बोलावून घेऊन आग्यास नजर कैदेत ठेवले असता, हा युक्तिबाज वीर आपल्या मुलास मिठाईच्या पेटाऱ्यातून पसार झाला. धाडस, चातुर्य, शौर्य, मुत्सद्देगिरी, गरीबांविषयी कणव, धर्मनिष्ठा, | परधर्माच्या बाबतीत सहिष्णुता, मातृ-पितृभक्ती, संताविषयी आदर, अन्यायाची चीड असे सर्वच सद्गुण शिवरायांमध्ये होते.
→ सुविचार
• जन्मामुळे नव्हे तर केवळ सद्गुणांमुळेच आपण थोर बनतो. थोर कृती हीच थोर मनाची साक्षीदार आहे. - जॉन फेचर. • कर्तृत्वाला कल्पकतेची जोड मिळाली म्हणजे अद्भूत कार्ये घडतात.
दिनविशेष
• सर महमंद इक्बाल स्मृतिदिन - १९३८ : सर महमंद इक्बाल हे उर्दूचे व फार्सीचे एक थोर कवी व विचारवंत होते. 'इक्बाल' हे त्यांचे कविनाम. त्यांचा जन्म सियालकोट येथे २२ फेब्रुवारी १८७३ ला झाला. सियालकोट येथील मरे कॉलेजातून ते बी.ए. झाले व लाहोर येथून त्यांनी तत्वज्ञानात एम.ए.ची पदवी घेतली. नंतर जर्मनीत जाऊन त्यांनी डॉक्टरेट मिळविली. इंग्रजी, जर्मन, फार्सी आणि उर्दू या चार भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. इंग्लंडहून बॅरिस्टर होऊन ते स्वदेशी परतले. काही काळ प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. शेवटपर्यंत त्यांनी वकिली व्यवसायच केला. लहानपणापासूनच ते कविता करत. 'सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा' ही ओजस्वी व राष्ट्रीय कविता त्यांनी सुरूवातीच्या काळात लिहिली. नंतर उर्दूऐवजी ते फार्सीत लिहू लागले व १९३५ पासून ते पुन्हा उर्दूत लेखन करू लागले. 'असरमे खुदी' (१९१५) 'रूमूजे बे खुदी' (१९१८) ही त्यांची दोन फार्सी भाषेतील खंडकाव्ये. या दोन्ही खंडकाव्यांचा अनुवाद प्राध्यापक निकलसन यांनी केला (१९२०). या ग्रंथामुळेच इक्बाल यांना 'सर' हा किताब बहाल करण्यात आला. त्यांच्या लेखनाला जागतिक कीर्ती मिळाली. 'पयामे मशरिक' आणि 'जावेदनामा' हे त्यांचे फार्सी काव्यसंग्रह १९२० साली निघाले. 'बाले जिबैल' आणि 'जर्बे-कलीम' (१९३५) हे त्यांचे उर्दू काव्यसंग्रह त्यांनी आयुष्याच्या अखेरीस लिहिले. १९३८ साली २१ एन रोजी त्यांचे देहावसान झाले.
मूल्ये
• सर्जनशीलता, आत्मविश्वास.
• १९१९ - शाहूंना "राजर्षी पदवी कानपुरच्या कृषी क्षत्रीय समाजाकडून बहाल केली.
→ अन्य घटना
• प्रसिध्द राजकीय नेते व थोर सामाजिक कार्यकर्ते केशवराव जेधे यांचा जन्म - १८९६
• नाशिकच्या काळाराम मंदिराचे दरवाजे
→ उपक्रम सर्वांसाठी खुले ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला - १९३२
• 'भारतीय प्रकल्प आणि सामग्री निगम'ची स्थापना - १९७१ - • छत्रपती शिवरायांबद्दल अधिक माहिती करिता पुरुषोत्तम खेडेकर यांचे शिवचरित्र हे पुस्तक वाचा.
→ समूहगान
• कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाये जा...
→ सामान्यज्ञान -
• अपृष्ठवंशी प्राण्यांना यकृत नसते.
• कवचधारी प्राण्यांत यकृत अग्निपिंड या नावाची एक लहान ग्रंथी असते.
• भक्ष्य कुरत खाणाऱ्या प्राण्यांत यकृताचे वजन त्याच्या शरीराच्या वजनाच्या सरासरी ५ टक्के असते.
• लाजाळूच्या पानांना हात लावला की
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा