24 एप्रिल दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना
ऐ मातृभूमि तेरे चरणों में सिर नवाऊँ...
→ श्लोक
- हे यज्ञप्रिय देव ! नित्य अमुच्या कानी पडो मंगल, नेत्रंनाहि दिसो सदैव अवघें जें जें वार : असे निर्मल । हे आम्ही स्तवितों स्थिरेंद्रिय अशी एकाग्रता साधुनि, जावो जीवित आमचे प्रभु ! तुझ्या, संपूर्ण आराधनी ।।
- हे यज्ञप्रिय देव ! आमच्या कानी नेहमी मंगलच पडो; डोळ्यांना नेहमी मंगलच दिसो, आम्ही सर्वावयवी एकाग्रता साधून, तुझे स्तवन करून, एवढेंच मागतों की, तुझा सेवेंतच आमचे जीवन व्यतीत होवो.
→ चिंतन
- छंदामुळे मनाला समाधान लाभते, जीवनाला एक प्रकारची शिस्त लागते. छंद सदासर्वकाळ जीवनाची सोबत करतात. नित्यनैमित्तिक कामे, अत्यावश्यक कामे कर्तव्य म्हणून अपरिहार्य असणारी कामे अशी सर्व तऱ्हेची कामे प्रत्येक व्यक्तीला रोज करावी लागतात. या सर्वांतून माणसाला पूर्ततेचे समाधान मिळू शकते. परंतु प्रत्येकाची अशी खास आवड असते, त्या आवडीखातर घालविलेला वेळ व्यक्तीला आनंद देत असतो. हा फुरसतीचा वेळ आपल्या मनाप्रमाणे घालविण्यासाठी माणसाने चांगले छंद लावून घेणे आवश्यक असते. मग तो छंद तिकिटे जमविण्याचा असो किंवा इतर कोणताही. या छंदाच्या जोपासनेतून माणसाच्या जीवनाला आपोआप एक प्रकारची शिस्त लागू शकते. माणूस स्वतःसाठी नियोजनपूर्वक वेळ काढून आपले छंद जोपासू शकतो आणि त्याचा मनस्वी आनंद उपभोगू शकतो.
कथाकथन
'हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी'- छत्रपती शिवाजी हे एक शूर योध्दा होते. त्यांची आई जिजाबाई ही लखुजी या निजामशाहीतील शूर सरदारांची मुलगी तर वडील शहाजीराजे भोसले हे स्वकर्तृत्वाने सामर्थ्यवान बनलेल्या मालोजीराव भोसले यांचे चिरंजीव. राजकारणात मुरलेल्या व स्वातंत्र्याचा उन्मेष बाळगणाऱ्या माता-पित्याच्या पोटी शिवाजीचा जन्म १९ फेब्रु. १६३० साली झाला. स्वदेश हवा हो माता-पित्यांची इच्छा शिवाजीने पूर्ण केली. हिंदू धर्माचा पाडाव करून सर्व हिंदुस्थान मुसलमानमय करून टाकावा या महत्वाकां झपाटलेला औरंगजेब हा दिल्लीच्या तख्तावर होता. विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही अशा यात सापडलेला पुणे-सुपे परिसर या तिन्ही मुस्लिम राज्यांवर औरंगजेबाची हुकूमत होती. तो दिल्लीहून सतत त्यांना सैन्य व पैसा पुरवत होता. परंतु शिवाजी हा स्वयंसिध्द, धोरणी, मुत्सद्दी, संघटना कुशल, पराक्रमी, लढवय्या पुरुष होता. संत तुकाराम यांचा त्यांना आशीर्वाद होता. तिन्ही मुस्लिम शाह्यांची वासलात लावून व मुसलमानधार्जिण्या मराठी सरदारांना वठणीवर आणणे हे सोपे काम नव्हते. औरंगजेब हा जबरदस्त लष्करी सामर्थ्याचा पराक्रमी, कट्टर मुसलमान पंथीय व दक्षिणेतील राजकारणाची माहिती असलेला बादशहा होता. पण शिवाजीने अफझलखानासारख्या पराक्रमी मुसलमान सरदारास यमसदनी पाठविल्यानंतर तो जिवंत असेपर्यंत महाराष्ट्रात येण्याची त्याची छाती झाली नाही. औरंगजेबाने शिवरायांना कडून आग्याला ठेवले, पण तेथूनही ते शिताफीने निसटले, तेव्हा औरंगजेबाने त्यांचा धसकाच घेतला.. उत्तम प्रशासक, धोरणी व मुत्सद्दी राजनीतीज्ञ, दूरदर्शी, कोणत्याही प्रसंगात न डगमगणारे, गनिमी युध्दाचे प्रणेते, उत्तम, स्वामिनिष्ठ सेवकांची संघटना बांधून प्रजेला सुख, शांती, न्याय मिळवून देणारे, आरमारी दुर्ग व डोंगरी किल्ले बांधून शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राचे आनंदवनभुवन बांधले. कोणत्याही लढाईत कधीही पराभूत न झालेला तोच एकमेव राजा आहे. माओ-त्से तुंगसारख्या चिनी क्रांतिकारकानेही शिवाजीच्या युध्दशास्त्राचा सूक्ष्म अभ्यास केला होता. जगातील अनेक राष्ट्रांत ती युध्दपध्दती वापरली गेली. ३ एप्रिल १६८० रोजी या महामानवाचे निधन झाले.
-> सुविचार
-• सत्य हे एखाद्या दिव्याप्रमाणे असते, ते असत्याच्या अंधारात लपत नाही.
• शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ.
• प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नांचा आनंद श्रेष्ठ असतो
• आचाराच्या उंचीवर विचारांची भव्यता अवलंबून असते.
• सदाचार व निर्मळ वर्तन शिक्षणाचे खरे फलित होय
• मारावे नाही तर मरून जावे हा क्षत्रियाचा धर्म होय.
दिनविशेष -
• दीनानाथ मंगेशकर स्मृतिदिन - १९४२: प्रख्यात मराठी गायक नट, संगीत रंगभूमीच्या एक शिल्पकार, एक अनुपम मोहक अशा रसरशीत गानशैलीचा कल्पक उद्गाता. प्रथम श्रेणीच्या मोजक्या गायक, नटांपैकी एक अतुलनीय, तेजस्वी व मनस्वी व्यक्तिमत्व गोमंतकातील मंगेशी येथे जन्म. तेथील निसर्गरम्य परिसरात दीनानाथांचे बालपण गेले. गणेशपंत हे त्यांचे वडील व येसूबाई या त्यांच्या मातोश्री त्यांना उपजतच उंच, खणखणीत, सुरेल व भिंगरीसारखी फिरत असलेला असामान्य आवाज व अस्खलित वाणी लाभली होती. "किलोस्कर नाट्य मंडळीत' केवळ चौदाव्या वर्षी त्यांना पाचारण करण्यात आले. त्या कंपनीच्या नाटकातील त्यांच्या संगीत भूमिका विलक्षण लोकप्रिय ठरल्या आपल्या विशाल, पाणीदार नेत्रांच्या देखण्या व प्रसन्न व्यक्तिमत्त्वाने निर्भर अशा मुक्त गायनाने त्यांनी रंगभूमि गाजवून सोडली. त्यांना 'मास्टर' उपपद लाभले. ते 'बलवंत संगीत मंडळीचे (स्थापना १९१८) प्रमुख मालक भागीदार होते. त्यांनी मराठीतील अग्रगण्य नाटककरांची नवनवीन नाटके रंगभूमीवर आणली. जुनी गाजलेली नाटके देखील बलवंताच्या रंगभूमीवर होत असत. त्यांच्या वेगळ्या शैलीची तडफदार गाणी नाट्यरसिकांना बेड लावून गेली. मराठी नाट्य संगीतावर त्यांच्या गाण्याचा ठसा उमटला. पुण्यामध्ये त्यांचे अकाली निधन झाले. शंकराचार्यांनी त्यांना 'संगीत रत्न' हो पदवी देऊन गौरविले होते.
→ मूल्ये
सर्जनशीलता. - • कलात्मकता,
→ अन्य घटना
• खंडेराव दाभाडे यांनी मोगलांचा पराभव केला १७१७. संशोधक कार्ट राईट यांचा जन्म १७४३
• र. वा. दिघे यांचा जन्म १८९६.
• भारतीय चित्रकार यामिनी रॉय यांचे देहावसान - १९७२.
→ उपक्रम -
• श्रीमंत कोकाटे यांचे सचित्र 'छत्रपति शिवाजीराजे' हे पुस्तक मिळवा व वाचा. • संगीत नाटकाबद्दल माहिती मिळवा. -
→ समूहगान
• ये देश है वीर जवानों का, अलबेलों का मस्तानों का...
→ सामान्यज्ञान -
• र. वा. दिघे कादंबऱ्या
• सराई
• वसंतराव आणि चाळीस चोर
• गानलुब्धा मृगनयना
• आई आहे शेतात
• पड रे पाण्या
• कार्तिकी
• पाणका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा