Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, १ एप्रिल, २०२४

26 एप्रिल दैनंदिन शालेय परिपाठ

 

       26 एप्रिल दैनंदिन शालेय परिपाठ



प्रार्थना

 सृष्टीकर्ता ईश प्यारे, एक हो तुम एक हो... 

 

→ श्लोक 

- होई तुष्ट साभाषितें मन सदा, आधी जरी खिन्न तें । अन्यांची परिसोनि सूक्ति, मन ती ऐकू पुन्हा इच्छिते ।।

-  अज्ञांच्यासह जाणत्यां, वश करूं यांनी शके कोणिही । ठेवी सूक्तित अवश्य यास्तव नरा, तू आपल्या संग्रही ।। वार : पर आधी चित्र झालेले असले तरी, सुभाषित ऐकून, ते पुन्हा प्रसन्न होते. दुसऱ्याच्या तोंडून चांगली सूक्ति एकदां ऐकून, (तृप्ती न होता), ती पुन्हा ऐकण्याची मनाला इच्छा होते. अज्ञानालाच काय सुज्ञाला सुध्दा, सुभाषितांच्या शक्तीने मनुष्य वश करूं शकतो. म्हणून, मनुष्यानें, सुभाषितें अवश्य आपल्या संग्रही ठेवली पाहिजेत


. → चिंतन 

- विद्या हो अमर्याद आहे. कितीही घेतली तरी संपत नाही. म्हणून प्रत्येकाने जन्मभर विद्यार्थी राहिले पाहिजे. संस्कृत भाषेत विद्येसंबंधी एक सुभाषित आहे. त्यात असे म्हटले आहे की, विद्या जणू काही अपूर्व, अद्भुत असा कोष आहे, खजिना आहे. त्या खजिन्यातील द्रव्ये दिली असता नित्य वाढत जातात. विद्या खर्च न करता, दुसऱ्यास न देता जर स्वतःजवळ साठवून ठेवली तर मात्र ती कालांतराने नाहीशी होते 



कथाकथन

 'दैनंदिनीची करामत': कमलेश हा मराठवाड्यातील बीड जिल्हयातील एका खेडेगावात राहणारा विद्यार्थी ! तो हुशार, चौकस आणि सद्वर्तनी मुलगा होता. तो ६ बीत उत्तम गुणांनी पास होऊन इयत्ता ७ वीत त्याने पब्लिक स्कूल औरंगाबाद येथे प्रवेश घेतला. या पब्लिक स्कूलमध्ये त्याला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यात त्याची प्रगती होत गेली ती मुख्यतः तो रोज लिहीत असलेल्या दैनंदिनी (डायरी) मुळे. तीत केवळ पार पाडलेल्या कामांची नोंदच नव्हती तर त्या दैनंदिनीत त्याची रोजची प्रार्थना, त्याला शिकायला मिळालेल्या गोष्टीची सविस्तर नोंद, मित्रांशी व इतर विद्यार्थ्यांशी त्याचे आलेले संबंध, त्यांच्या भावभावनांचे बोलके वर्णन, चांगल्या घटनांचे त्याच्यावर झालेले परिणाम यांचे भावमधुर वर्णन तो रात्री झोपण्यापूर्वी लिहून काढीत असे. मुख्यतः आपल्या हातून घडलेल्या चुका, त्या टाळण्यासाठी त्याने केलेली प्रतिज्ञा, तिची अंमबजावणी, रोजचा एक चांगला निश्चय, तो अंमलात आणण्याचा कसोशीचा प्रयत्न सुंदर चित्रण असे. रोज तो एखाद्या ध्येयाला किंवा आदर्श व्यक्तीला, चांगल्या मार्गदर्शक घटनेला नमस्कार करूनच (तसे लिहून) झोपत असे याचे काही नमुने असे - निर्भयतेला नमस्कार - निर्भय झालं पाहिजे, महात्मा फुले यांचे चरित्र वाचायचे. त्यांना वंदन करीत झोपतो. एकीला वंदन, शुध्दलेखनाला व सामान्यज्ञानाला वंदन. वसतिगृहातील मुलांनी ताटात उष्टे टाकलेले अन्न घेण्यास गरीब मुले रात्री बारा वाजेपर्यंत ताटकळत उभे असलेली पाहून. ताटात उष्टे अन्न टाकायचे नाही असे ठरवून अन्नब्रह्मला वंदन करून झोपण्याची प्रतिज्ञा केली. डिक्शनरीने पाहिजे त्या शब्दाचे ज्ञान होते. हे पाहून डिक्शनरी नेहमी वापरण्याचा संकल्प करून, डिक्शनरीला वंदन करून झोपतो. 'मनाविरूध्द काही घडलं की चिडत असे, असे चिडणे योग्य नव्हे. चिडकी वृत्ती सोडण्याची प्रतिज्ञा करून झोपी गेलो.' नंतर निश्चयाने चिडकी वृत्ती सोडली अशा रितीने सद्गुणांचा पाठपुरावा करीत व दुर्गुणांचा त्याग करीत तो संस्कारित होत गेला. कारण त्याने दैनंदिनीत रोज अशा तन्हेची प्रतिज्ञा लिहून ती प्रत्यक्षात आणली. पुढे हा कमलेश खरा मित्र, शिस्तप्रिय, अभ्यासू विद्यार्थी, सर्वांना बरोबर घेऊन काम करणारा नेता, शालेय वर्तमानपत्र व सामाजिक लेख लिहून साहित्यिक, विद्यार्थी मित्रांचे व शिक्षकांचे गुण ग्रहण करणारा रसग्राही समंजस माणूस व त्याचे दोष दुर्लक्षित करून त्यात बदल घडवून आणणारा समाजसेवक बनला. पुढील शिक्षण पूर्ण करून तो डॉक्टर झाला व एका निमशहरी गावात गरिबांचा डॉक्टर व समाजसेवक बनला. अजूनही तो रोज दैनंदिनी लिहून माणुसकीची उच्च पातळी गाठत आहे. त्याने आपल्या विद्यार्थी दशेतील दैनंदिनाच्या लिखाणावर संस्कार करून 'स्वप्नपंख' नावाची ४८० पानांची कादंबरी लिहून प्रकाशित केली आहे. ही मोठी भरारी त्याने समाजजीवनाच्या आकाशात मारली तो या दैनंदिनीच्या करामतीचे पंख प्राप्त करून. 

 

*सुविचार 

*• सद्गुणांची दुसऱ्याकडे पाहा आणि दुर्गुणांसाठी स्वतःकडे पाहा.


दिनविशेष 

-• रामानुजन श्रीनिवास अय्यंगार स्मृतिदिन - १९२०: भारतीय गणित संख्या सिध्दान्त या विषयातील कार्याकरिता विशेष प्रसिध्दी रामानुजन यांचा जन्म मद्रासमधील एरोडे येथे २२ डिसेंबर १८८७ ला झाला. त्यांनी प्रारंभी स्वत च त्रिकोणमितीचा अभ्यास केला काही प्रमेये मांडली. १९०३ मध्ये त्यांना जी.एस.कार यांचा एक ग्रंथ अभ्यासण्याची संधी मिळाली. या ग्रंथामुळे रामानुजन यांच्या कुशाग्र बुध्दीला मिळाली. गणिताचा सतत अभ्यास करण्याच्या नादात त्यांनी इंग्रजी भाषा व इतर विषयांकडे दुर्लक्ष केल्याने ते परीक्षेत अनुतीर्ण झाले. पुढे प्रत परीक्षेला बसण्याचा प्रयत्न त्यांनी सोडून दिला, पण त्यांनी गणितातील आपले स्वतंत्र कार्य पुढे चालू ठेवले. रामानुजन यांचे गणितातील ज्ञान आश्चर्यकारक होते व त्यातील बहुतेक त्यांनी स्वतःच प्राप्त केलेले होते. या विषयातील त्यांचे प्रावीण्य त्या काळच्या गणितज्ज्ञांच्या तुलनेने अस्त्वसाधारण होते. त्यांच्या कार्याचा विविध देशातील गणिततज्ज्ञ अद्यापही अभ्यास करीत आहेत. इ.स. १९१७ मध्ये रामानुजन आजारी पडले. त्यामुळे इंग्लंडमधील उर्वरित त्यांचे वास्तव्य निरनिराळ्या आरोग्यधामांत गेले. प्रकृती सुधारल्यावर १९१९ मध्ये ते भारतात आले. मद्रास विद्यापीठाने पाच वर्षाकरिता त्यांना शिष्यवृत्ती जाहीर केली. २६ एप्रिल १९२० ला ते निधन पावले.


 मूल्ये 

 •विज्ञाननिष्ठा, परिश्रम -


 → अन्य घटना 

 • श्रीवल्लभाचार्याचा जन्म - १७४९.

  • मॉस्को विद्यापीठाची स्थापना - १७५५

   • पंजाबी साहित्यिक गुरुबक्षसिंग यांचा जन्म - १८९५

    • भारतातल्या पहिल्या वृत्तपत्रकागदाच्या कारखान्याचे पंडित नेहरू यांच्या हस्ते उद्घाटन - १९५६.

    

 + उपक्रम -

 +  • गणितातल्या काही गमती मुलांना दाखवून गणिताकडे वळण्याची त्यांना संधी देणे, सवय लावणे. 


→ समूहगान 

ऐ मेरे वतन के लोगों, तुम खुब लगा लो नारा..... 


→ सामान्यज्ञान

 भारतातील शास्त्रज्ञ :- 

 •रामन सी.व्ही. भौतिक शास्त्र 

• शहा एम. एन. खगोलशास्त्र

 • बोस जगदीशचंद्र • वनस्पतीशास्त्र व विद्युतशास्त्र 

 • भाभा होमी जे. अणुसंशोधक

  • साराभाई विक्रम अवकाश संशोधक 

  • राजा रामण्णा - अणुसंशोधक 

  • रे. प्रफुल्लचंद्र रसायनशास्त्र.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा