27 एप्रिल दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना
- मंगलनाम तुझे सतत गाऊ दे...
→ श्लोक
- शोभा देति न हार शुभ्रहि तसे, केयूरही मानवा। न स्नानें, न विलेपनें, न कुसुमें, शृंगारिले कॅस वा ।। वाणी संस्कृतियुक्त एकच नरा, शोभा खरी देतसे । वाणी हीच अपूर्व भूषण सदा, नाशा दुर्जे जातसे ।।
- केयरादि अलंकार, शुभ्र हार, स्नान, उटी, फुलें किंवा केशभूषा यापैकी एकानेही माणसाला शोभा येत नाही. संस्कारयुक्त वाणी ही एकच माणसाच | खरा अलंकार! इतर सर्व भूषणे नष्ट होतील, पण भूषणांतलें भूषण वाणी (मात्र टिकून राहील.)
-
→ चिंतन-
'मी हे करू शकेन?' 'हे मला केलेच पाहिजे.' असा शब्द अंतःकरणातून सहज उमटला म्हणजे माणसाची यशाकडे वाटचाल सुरु झाली असे खुशाल समजावे. अशा शब्दामागे माणसाचा आत्मविश्वास, त्याची जिद्द उभी असते. एकदा का माणसाचा स्वर्तृत्वावरचा विश्वास जागा झाला की त्याच्या कृतीत, उक्तीत विचाराने टाकावयाच्या पावलांचा आरखडा दिसू लागतो आणि इच्छित ध्येय गाठण्याकडे त्याची वाटचाल सुरू होते. धावल्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे.
कथाकथन
- 'अस्वल व कोंबड्या': पर्वतावर राहणाऱ्या एका अस्वलाला असे वाटले की, जगभर प्रवास करून निरनिराळे प्रदेश त्यांची शेतीभाती यांचा अभ्यास करावा. मग ते अस्वल प्रवासाला निघाले असता त्याने बरीच अरण्ये व देश पाहिले. एके दिवशी वाट चुकून ते शेतकऱ्याच्या कुंपणात शिरले असता तेथे त्याने एका डबक्याजवळ बऱ्याच कोंबड्या पाणी पीत असताना पाहिल्या. त्या कोंबड्या पाण्याचा एक घेतल्यावर आकाशाकडे तोंड करत व पुन्हा खाली तोंड करून दुसरा घोट घेत. हा प्रकार पाहून अस्वलाला इतके नवल वाटले की त्याविषयी मि मिळावी म्हणून त्याने कोंबड्याला विचारले, “पाणी पिताना असे सारखे-सारखे आकाशाकडे काय बघता?" त्यावर कोंबड्या म्हणाल्या, " आम्हाला जी सुखं दिली त्याचे आभार मानण्यासाठी आम्ही असं करतो. ही धार्मिक चाल फार दिवसांपासून चालत आली असून ती जर मोडली आम्हाला मोठं पाप लागेल," हे एकताच अस्वल मोठ्याने हसू लागले व धर्मभोळेपणाची टर उडवू लागले. तेव्हा एक कोंबडी रागावून मोठ्य धीटपणे म्हणाली, "तू या ठिकाणी अगदी नवीन आहेस, त्यामुळे तुझी ही असभ्य अशी वागणूक कदाचित क्षम्य असेल, पण एक गोष्ट सांगितल्याशिवाय मला राहावत नाही. ती ही की, जे लोक धार्मिक कृत्यावर विश्वास ठेवतात त्यांच्या देखत त्या धार्मिक कृत्याची टवाळी कापस अस्वलाशिवाय दुसरा कोणताही प्राणी तयार होणार नाही." ताप्तर्य की दुसऱ्याच्या धर्माविषयी टवाळकी करणे मूर्खपणाचे होय. असे सिद्धांता कथाकथ ठरलेल्या वे पाहुणे फार इसापला ठेवलेस? अभिनंद इस आजच सर्वात आद 44
→ सुविचार
• प्रत्येक धर्माबद्दल सहिष्णुता बाळगली पाहिजे. कारण ज्याच्या त्याच्या मार्गानेच मनुष्याने मोक्ष गाठला पाहिजे.
• स्वधर्माविषयी प्रेम, परधर्माविषयी आदर आणि अधर्माविषयी उपेक्षा मिळून धर्म.
दिनविशेष
-कृष्ण स्मृतिदिन १८९८. पाश्चिमात्य आणि पौर्वात्य ज्योतिष गणिताचे अभ्यास भारतीय ज्योतिष शास्त्राच्या इतिहासातील आधुनिक काळातील एक ओर संशोधक, दीक्षित यांचा जन्म दापोली तालुक्यात (१८५३) प्राथमिक शिक्षणाबरोबरच संस्कृत यांचेही क्षणांनी घेतले. सन १८७० पासून तीन वर्षे पुण्याच्या ट्रेनिंग रेवदंडा, डा. बार्शी, जे इत्यादि ठिकाणच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये त्यांनी काम केले. त्यांना ज्योतिषशास्त्र व गणित या वि होता. प्रथम त्यांनी सायनपंचांग प्रसिध्द करणे, इंडियन कैलेंडर ग्रंथाची तयारी करणे आदि कार्य केली. 'भारतीय ज्योतिषशास्त्र' हा नावाजलेला ग्रंथ, वैदिक काळापासून आधुनिक काळापर्यंत भारतीय ज्योतिषशास्त्राचा सुसंगत इतिहास या महत्वाच्या ग्रंथात प्रथम झालेला आहे. या ग्रंथामुळे दीक्षित यांची कीर्ती सर्वत्र पसरली. पाश्चात्य व पौर्वात्य अभ्यासकांच्या ज्ञानाशी त्यांचा दीर्घ परिचय होता. अथवा रात्रीची दोन घटका मौज' हा आणखी एक अतिशय मनोरंजक व शास्त्रीय विषयावरील ग्रंथ त्यांनी लिहिला. सर्वसामान्य लोकांना बाटेल अशा रीतीने त्यांनी हा ग्रंथ लिहिला आहे. धर्ममीमांसा, सोप्यातील अंकगणित, सृष्टी चमत्कार, विद्यार्थी बुध्दिवर्धिनी, भारतवर्षीय ही त्यांची पुस्तके आजही अभ्यासकांना अतिशय उपयुक्त अशी आहेत. अत्यंत साध्या वृत्तीने राहून प्रसिध्दीची हाव न धरता त्यांनी ज्योतिषशास्त्रविषयक कार्य मोठे आश्चर्यकारक असेच आहे.
→ मूल्ये
• ज्ञाननिष्ठा, परिश्रम,
→ अन्य घटना
• ब्रिटिश शिक्षणतज्ञ हर्बर्ट स्पेन्सर यांचा जन्म १८२०
• कोलकाता विद्यापीठाने स्त्रियांना उच्च शिक्षण घेण्याची मंजुरी दि - - १८७८.
• नाटककार मामा वरेरकर यांचा जन्म १८८३. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील स्मृतिदिन १९८०.
→ उपक्रम
• आकाशदर्शन घडवून नक्षत्रांचा परिचय करून देणे.
→ समूहगान
• बालवीर हो सज्ज होऊ या, गात गात बाल घेत मार्ग काढू या....
→ सामान्यज्ञान
• आकाशातील तारे, ग्रह, नक्षत्रे तारकासमूह का धूमकेतू या संदर्भातील अभ्यासाला ज्योतिर्विद्या असे भारतीय आहे. ज्योति म्हणजे प्रकाश देणारी वस्तू, त्याबद्दलची माहिती व ज्ञान देणारे शास्त्र म्हणून ज्योतिर्विद्या. त्याचाच Astronomy हा शब्द म्हणजे तारे व नॉमिया म्हणजे त्यांची रचना असा बनलेला असून त्याचे मूळ ग्रीक आहे. याबद्दलचे प्रगत शिक्षण देण्याची सोय पुणे येथे आयुक Inter University Centre for Astronomy & Astrophysics] येथे आहे. येथे खगोलशास्त्राचे प्रगत अध्ययन केंद्र विकसित होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा