3 एप्रिल दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना
असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय...
→ श्लोक
तिधारः समर्थानां किं दूर व्यवसायिनाम्। को विदेशः सुविद्यानां कः परः प्रियवादिनाम् ।।
सामर्थ्य असलेल्यांना मोठे ओझे कोणते? उद्योग करणाऱ्यांना दूर काय? चांगली विद्या असणाऱ्यांना परका देश कुठला? गोरका कोण?
→ चिंतन-
वैयक्तिक सुखाचा विचार सर्व जण करतात. पण, प्रसंगी आपल्या सुखाचा लोप करूनही थोर माणसे आधी दुसऱ्याच्या सुखाचा वि करतात. संत हे तर दुसन्याच्या सुखासाठीच जीवन जगत असतात. तुकाराम महाराज म्हणतात - "तुका म्हणे सुख । पराविया सुखे ।" दुसन्याचा उपकार करण्यापुरते आपले जीवन आहे, असे संत मानतात.
कथाकथन
'कमलादेवी चट्टोपाध्याय (जन्म ३ एप्रिल १९०३ - मृत्यू २९ ऑक्टोबर १९८८) कमलादेवी चट्टोपाध्याय या नाम क्या कलाप्रेमी व देशभक्त विदुषीचा जन्म मंगलोरमधील एका सारस्वत कुटुंबात झाला. त्यांचे तिथल्या एका कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षण। असतानाच त्यांचा विवाह झाला. परंतु दुर्दैवाने अल्प काळात त्यांच्या पतीचे निधन झाले. तरीही थोड्याच दिवसात स्वतःला सावरून त्यांनी पुढे चालू ठेवले. सीनियर केंब्रिजपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी मद्रासच्या क्वीन मेरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळविला व तो अभ्यास नेटाने स किल्ला पण, त्याच वेळी इंग्रजीतील नामवंत कवी हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांच्याशी त्यांचा पुनर्विवाह झाला व कॉलेजचे शिक्षण अर्धवट सोडण्याच त्यांना निर्णय घ्यावा लागला. लग्नानंतर त्यांनी आपल्या नाटककार व कवी असलेल्या पतीच्या साहाय्याने भारतीय रंगभूमीला आधुनिक स्वरू देण्यासाठी नवनवे प्रयोग सुरू केले व तिला आधुनिक स्वरूप दिले. नंतर पती डॉक्टरेट करण्याकरिता लंडनला गेले असता त्याही त्यांच्याबरोबर गेल्या व समाजशास्त्राचा अभ्यास करता करता त्या इंग्लिश रंगभूमीचा | अभ्यास करू लागल्या. परंतु थोड्याच दिवसात भारतात महात्मा गांधींनी ब्रिटीश राज्यकर्त्यांविरुद्ध असहकाराची चळवळ सुरू केली. त्या चळवळीच्या बातम्या तिथल्या वृत्तपत्रांमधून वाचताच त्यांचे देशावरचे प्रेम त्यांना तिथे राहू देईना. त्या तिथला अभ्यास अर्धवट टाकून भारतात आल्या व गांधीजींच्या स्वातंत्र्यासाठीच्या चळवळीत हिरीरीने भाग घेऊन तुरुंगवासालाही तोंड देऊ लागल्या. पुढे काँग्रेसचे शेतकऱ्यांकडे होत असलेले दुर्लक्ष त्यांना पसंत न पडल्याने त्यांनी त्या पक्षाचा राजीनामा दिला व त्या काँग्रेस सोशालिस्ट पक्षात सामील झाल्या. कामगार चळवळीतही त्या भाग घेऊ लागल्या. 'भारतीय स्त्री परिषद' ही संघटना त्यांच्याच प्रयत्नातून आकाराला आली. स्त्रियांच्या जागृतीसाठी त्यांनी घेतलेल्या सततच्या कष्टांमुळे बर्लीन, जिनेव्हा, प्राग, एल्मिनोर येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय स्त्री परिषदांना भारतीय स्त्रियांच्या प्रतिनिधी म्हणून त्या गेल्या होत्या. प्रभावी लेखन, तडफदार वक्तृत्व व प्रगत विचार यांमुळे परदेशात भरलेल्या परिषदांमध्येही त्यांची ताबडतोब छाप पडे. सार्वजनिक क्षेत्रात त्यांनी जी नेत्रदीपक कामगिरी केली. त्याबद्दल १९६२ साली त्यांना 'बाटुमल पुरस्कार' व १९६६ साली त्यांना 'मॅगसेसे पुरस्कार' व तसेच इतरही अनेक पुरस्कार मिळाले. पुढे त्यांच्यावर हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांच्यापासून विभक्त होण्याचा प्रसंग आला.
*सुविचार
*• आत्मसंयम, आत्मजाणीव आणि आत्मसुधारणा हे तीन गुण ज्याच्यापाशी आहेत, + त्याने जग जिंकलं असं समजावं' - टेनिसन
दिनविशेष
• महावीर वर्धमान इ.स. पूर्व ५९९ ते ५२७ महावीर जयंती. जैन धर्मातील २४ वे अखेरचे तीर्थंकर जैन धर्माला प्रभावशाली फार मोठे श्रेय महावीरांकडे जाते. भगवान गौतम बुद्धांच्या बरोबर त्यांचे नाव घेतले जाते. मगध देशातील (सध्याच्या दक्षिण बिहारमधील) औपुरात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील सिद्धार्थ हे या उपनगराचे प्रमुख होते व आई त्रिशला, लिच्छवी वंशीय राजाची मुलगी होती हावीराची प्रवृत्ती लहानपणापासूनच चिंतनशील व वैराग्यशील होती. वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला. नंतरची बारा वर्षे त्यांनी तप केले. अज्ञानी लोकांनी या काळात त्यांचा खूप छळ केला. पण, त्यांनी तो शांतपणे सोसला. वयाच्या ४२ व्या वर्षी त्यांना केवलज्ञान प्राप्त झाले त्यानंतर मृत्यूपर्यंत म्हणजेच पुढची तीस वर्षे ते धर्मोपदेश करीत राहिले. त्यांनी जैन धर्माचे व श्रमण संघाचे पुनरुज्जीवन केले. त्यामुळे त्यांच्याविषयी धर्मसंस्थापकाइतका पूज्यभाव लोकांच्या मनात निर्माण झाला. सर्वसामान्य माणसांना उपदेश समजावा म्हणून त्यांनी अर्धमागधी या प्राकृत भाषेचा वापर केला. लोककल्याणाच्या तळमळीने ते सर्वत्र हिंडले. यज्ञयागातील हिंसेला त्यांनी विरोध केला. महावीरांचे चरित्र म्हणजे साधुचरित्राचा आदर्श होय, तितिक्षा, क्षमा, अहिंसा, समता, त्याग इत्यादि गुणांची परमावधी त्यांच्या ठिकाणी झाली होती. कोणीही त्रास दिला तरी मन शांत ठेवण्याची, इंद्रियांवर ताबा ठेवण्याची, अंगी नम्रता धारण करण्याची, सत्य बोलण्याची, प्राण्यांवर प्रेम करण्याची, त्यांना पीडा न देण्याची शिकवण त्यांनी दिली. आश्विन अमावस्येच्या दिवशी त्यांचे निर्वाण झाले.
→ मूल्ये
मानवता, सेवा,
छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन. १६८०
• सुप्रसिद्ध सामाजिक व राजकीय कार्यकर्त्या कमलादेवी चट्टोपाध्याय - यांचा जन्मदिन - १९०२
• संरक्षण दलाचे पहिले फील्डमार्शल सॅम माणेकशा यांचा जन्मदिन. - १९१४
• राकेश शर्माने अंतराळात प्रथम पाऊल ठेवले. - १९८४ -
→ उपक्रम
• शिवरायांच्या जीवनप्रसंगावर कथाकथन स्पर्धा आयोजित करावी. (कथाकथन करण्यास विद्यार्थ्यांना उद्युक्त करावे.)
• महावीर वर्धमान यांच्या जीवनातील कथा सांगणे. • महावीर वर्धमान यांची शिकवण यावर लेखन घेणे.
→ समूहगान -
• बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो....
→ सामान्यज्ञान
• भारतात एकूण १००० पेक्षा भाषा आणि बोलीभाषा आहेत. • मालवाहू म्हणून सामान्यतः वापरण्यात येणाऱ्या जहाजापेक्षा लहान व चलनासाठी इंजिनाचा वापर करणाऱ्या जलवाहनास 'मोटरबोट' म्हणत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा