5 एप्रिल दैनंदिन शालेय परिपाठ
→ प्रार्थना
गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णु, गुरुदेवो महेश्वरा....
→ श्लोक
- आकाशात्पतितं तोयं यथा गच्छति सागरम् । सर्व देव नमस्कारः केशवं प्रति गच्छति ।। ज्याप्रमाणे आकाशातून पडलेले पाणी सागराकडे जाते (त्याप्रमाणे) सर्व देवांना (कोणत्याही देवाला) केलेला नमस्कार केशवाकडे, परमेश्वराकडे जातो.
→ चिंतन-
विद्या, प्रज्ञा, करुणा, शील व मैत्री या पंचतत्वांनुसार आपले चारित्र्य घडवले पाहिजे. हा मार्ग खडतर आहे. या मार्गाने एकट्याने जावे लागले तरी मनी धैर्य व निष्ठा राखून गेले पाहिजे. 'विद्येनेच मनुष्या आले श्रेष्ठत्व या जगामाजी असे वचन प्रसिद्धच आहे. आपली प्रज्ञा म्हणजे बुद्धी. सारासार विचार करून निर्णय घेण्याची क्षमता आपल्या बुद्धीत शिक्षणाने विकसित झाली पाहिजे. सृष्टीतील प्राणिमात्रांबद्दल योग्य ती करुणा, दया आपल्यामध्ये रुजली पाहिजे, चारित्र्याला, मैत्रीला आपल्या जीवनात उच्च स्थान असत पाहिजे. हे सगळे मिळविणे आणि जतन करणे अवघड आहे. पण ते केलेच पाहिजे.
कथाकथन
'श्री संत नामदेव त्यांच्या मातोश्रीदेखील सदैव विठ्ठलाचे नामस्मरण करीत असत. नामदेवांनी वयाच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'विठ्ठल विठ्ठल' असे शब्द उच्चारण्यास - (इ.स. १२७० ते १३५०) महान भगवद्भक्त श्री नामदेव हे विठ्ठलभक्त दामाशेठ रेळेकर या केली. त्यांच्या मातोश्रींचे नाव गोणाई होते. नामदेव लहान असताना राऊळात जाऊन 'विठ्ठल रखुमाई' असे नामस्मरण करीत बसत. पांडुरंगदेखील अ रूपे घेऊन त्यांच्याबरोबर खेळत असे. • चिंतन- एखाद्या कार्यासाठी दृढनिश्चय उपसा साध्यम्' म्हणजे सर्व काही तपश्च गोष्टी प्राप्त केल्या. हाच दृढनिश्चय एकलव म्हणून त्या त्या क्षेत्रात उच्चपदी पोचलेली → कथाकथन - परोपकाराचे फट एकदा दामाशेठ लवकर घरी आले नाहीत म्हणून गोणाईने नामदेवास राऊळात जाऊन पांडुरंगास नैवेद्य दाखवून आणण्यास सांगितले. नामदेवाने नैवेद्याल ताट पांडुरंगापुढे ठेवले व हात जोडून म्हणाला, "पांडुरंगा, भोजन करावे!" पांडुरंग भोजन करुन नैवेद्य खाईल, असे नामदेवास वाटत होते; परंतु प जेवेना. तेव्हा नामदेव रडू लागला व म्हणाला, "पांडुरंगा, वडिलांना घरी येण्यास विलंब लागला म्हणून आईने मला पाठविले, तू जर जेवला नाहीस तर छ। मला मारेल." मोठ्या भक्तीने नामदेवाने पांडुरंगाची प्रार्थना केली. त्याची विनवणी ऐकून पांडुरंगाने त्या समयी भोजन केले. पांडुरंगाने नैवेद्य खाल्य त्यांची पाणी मिळविण्यासाठी चालले नामदेवांनी आई-वडिलांना सांगितले. ते विस्मित झाले, नामदेव ज्ञानेश्वरांकडे गेले. त्यांनी नामदेवांचा अधिकार जाणला व गुरुचे मार्गदर्शन व आशीर्वाद घेण्यास सांगितले. नामदेव गुरुशोधार्थ निघाले. औंढ्या नागनाथ येथे विसोबा खेचर यांची भेट झाली. नामदेवाने त्यांना गुरू केले. विसोबा खेचरांनी त्यांना दिले. मच्छिंद्रनाथाने गोरक्षणास उपदेश दिला, तीच गुरुपरंपरा पुढे चालू राहिली होती. गैनीनाथाने निवृत्तीनाथांना, निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना, ज्ञानेश्वरा पत्र, त्यानं आपलं काम तसंच चाल विसोबा खेचराला व विसोबा खेचराने नामदेवाला त्याच मंत्रोपदेशाची माहिती दिली. पंढरपुरास नामदेवाची मोठी कीर्ती होती. त्यांची भेट घेण्यास ज्ञानेश्व | पंढरपुरास आले. नामदेवांनी त्यांच्या चरणी मस्तक ठेविले, तेव्हा ज्ञानेश्वरांनी नामदेवास सांगितले की, “तुला बरोबर घेऊन तीर्थेयात्रेला जाण्याचा हेतू ध तुझ्या भेटीसाठी आलो आहे. तुझी संगत घडावी हाच तीर्थे करण्याचा मुख्य उद्देश आहे." पंढरीनाथाची परवानगी घेऊन ते दोघे तीर्थयात्रेस निघाले. उस हिंदुस्थानात गेले. हस्तिनापुरास येऊन पोहोचले. नामदेवांनी तेथे कीर्तन केले. या दोन संतांचे सर्वत्र प्रचंड स्वागत होऊ लागले. नंतर काशी, गया, प्रयोग हु ठेवलं. फळांचा मोठा ढीग जमल अनेक तीर्थे करून ते मारवाड देशात गेले. तेथून ते औंढ्या नागनाथास आले. ते एक ज्योतिर्लिंगाचे स्थान आहे. हे पुण्यक्षेत्र म्हणजे दुसरा कैलासच आहे. ज्ञानेश्वर व नामदेव यांनी श्रीशिवशंकराचे दर्शन घेतले. नंतर नामदेवांनी तिथे कीर्तन करण्यास आरंभ केला. त्यांच्या कीर्तनास लोकांची फारच गर्दी झाली. तिथल्या ब्राह्मणांनी नामदेवास सांगितले की, "तुमच्या भजन-कीर्तनाची प्रौढी पंढरपुरास येथे नागनाथास त्याचे महात्म्य नाही. हा कैलासपती उमारमण यास कीर्तन प्रिय नाही. पंढरपुरात जा आणि तिथे कीर्तन करा, नाथा!" यावर श्रोते म्हणाले, "शंकरासमोर कीर्तन करू नये असे कोठे सांगितलं आहे? हरिह्यामध्ये भेद नाही असे महान मुनी, श्रेष्ठ तपस्वी सांगतात.” तेव्हा ब्राह्मणांनी नामदेवांना सांगितले की, “लोक पूजेकरिता खोळंबले आहेत. तुम्ही देवळाच्या मागे जाऊन कीर्तन करा.' नामदेवाचे डोळे पाण्याने भरून आले. त्यांनी सद्गदित अंतःकरणाने पांडुरंगाचा धावा केला. ते देऊळ जे पूर्वाभिमुख होते ते फिरून नामदेवांच्या समोर तोंड आले. या चमत्काराने सर्वांना नवल वाटले. नामदेवांचे कीर्तन मोठ्या रंगात आले होते, शंकराची पूजा आटोपून ब्राह्मण बाहेर आले. त्यांनी देऊळ फिरल्याचे पाहिले. ब्राह्मण नामदेवांना शरण गेले, ते फिरलेले देऊळ अद्यापि तसेच आहे. नंतर ज्ञानेश्वर व नामदेव पंढरपुरास आले नामदेवांवर व नामदेवांचे पांडुरंगावर दृढ प्रेम होते. पंढरपुरातील सर्व लोकांना हे माहीत होते. नंतर काही दिवसांनी ते एकटेच पंजाबात गेले. तिथे त्यांनी भार धर्माचा प्रसार केला. नामदेवांचे काही अभंग 'ग्रंथसाहेब' या ग्रंथात समाविष्ट केले आहेत. आषाढ वद्य १३ शके १२७२ रोजी टाळमृदुंगांच्या गजरात, विठ्ठलनामघोषात महाद्वाराच्या पायरीमध्ये ते गुम झाले. परब्रह्मात विलीन झाले, ईश्वरी चैतन्यात मिळून गेले. नामदेवांचे आणि पांडुरंगाचे पूर्ण ऐक्य झाले. शकत नव्हता. याचे कारण
सुविचार -
• सच्चिदानंदघन जेथे हारपले मन । त्याहुनि चरण गोड तुझे ।। नामा म्हणे तुझी पाऊलें सुकुमार । ते माझे माहेर विटेवरी ।
→ दिनविशेष -
• पंडिता रमाबाई स्मृतिदिन 1 १९२२ - स्त्रियांच्या विशेषतः परित्यक्ता, पतिता व विधवांच्या सर्वांगीण उद्धाराकरिता | समर्पित भावनेने कार्यरत असलेली महाराष्ट्रीय विदुषी. जन्म २३ एप्रिल १८५८. लक्ष्मीबाई उर्फ अंबाबाई आणि अनंतशास्त्री डोंगरे हे त्यांचे माता-पिता, अनंतशास्त्री पुरोगामी विचारांचे होते. लक्ष्मीबाईस व रमाबाईस त्यांनी वेदादींचे शिक्षण दिले. रमाबाईंच्या जन्मानंतर सहा महिन्यातच आईवडील तीर्थयात्रेस पायी निघाले. तीर्थयात्रेच्या पंधरा-सोळा वर्षाच्या काळात रमाबाईना आई-वडिलांकडून संस्कृत, साहित्य व व्याकरणाचे शिक्षण मिळाले. संस्कृतप्रमाणेच रमाबाईंना मराठी, हिंदी, बंगाली आणि कन्नड भाषाही अस्खलितपणे बोलता येत होत्या. १८७८ साली त्या कोलकात्यात आल्या तेथे त्यांच्या विद्वत्तेचा उचित गौरव झाला. त्यांना 'पंडिता' व 'सरस्वती' या बिरुदावल्या बहाल करण्यात आल्या. बंगाली स्त्रियांनी त्यांना 'भारतवर्षीय स्त्रियांचे भूषण' म्हणून मानपत्र दिले. कोलकात्त्यातील बिपीन बिहारीदास मेधा यांच्याशी त्यांनी विवाह केला. परंतु थोड्याच दिवसात अल्पशा आजाराने बिपीन बिहारीदास कालवश झाले. १९१९ साली रमाबाईंना त्यांच्या कार्याबद्दल 'कैसर-ई-हिंद' हे सुवर्णपदक मिळाले. सर्व आप्तांच्या निधनानंतर एकाकी पं. रमाबाई महाराष्ट्रात येऊन राहिल्या. विधवांसाठी शारदासदन ही संस्था त्यांनी काढली. पुढे शांतिसदन, कृपासंदन, प्रीतीसदन अशा संस्था वाढविल्या. केडगाव येथे स्त्रियांसाठी आश्रम व उद्योगसंस्था काढली. आपली एकुलती एक मुलगी मनोरमा हिच्या निधनानंतर लवकरच रमाबाई निवर्तल्या.
→ मूल्ये -
• परिश्रमनिष्ठा, सेवाभाव.
→ अन्य घटना
• शाहिस्तेखानावर शिवरायांचा हल्ला. - १६६३
• बाबुजगजीवनराम शोभीराम जयंती. - १९०८
→ उपक्रम
• पहिली भारतीय बाष्पनौका समुद्र पार करू लागली. - १९१९
• भारत स्काऊट गाईडची स्थापना. - १९४९ -
• पंडिता रमाबाईंच्या कार्याची माहिती विविध प्रसंगाधारे कथन करावी.
→ समूहगान -
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे.....
→ सामान्यज्ञान
• पंडिता रमाबाईंची ग्रंथनिर्मिती - स्त्री-धर्म- १८८४, ० द हाय कास्ट हिंदू वूमन - १८८७/८८,
• युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती व प्रवासवृत्त - १८८९,
• हिब्रु भाषेचे व्याकरण - १९०९, नवा करार - १९१२,
• प्रभू येशू चरित्र - १९१३,
• भविष्य कथा - १९१७,
• अ टेस्टीमनी, मुक्ती प्रेअर, फॅमिन एक्सिपरिअन्स इन इंडिया.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा