7 एप्रिल दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना
देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो...
→ श्लोक
- सुखार्थी चेत् त्यजेद्विद्यां विद्यार्थी चेत् त्यजेत् सुखम् । सुखार्थिनां कुतो विद्या विद्यार्थिनां कुतः सुखम् वार: सुखलोलुपता विद्येला पारखे होण्यास कारणीभूत होऊ शकते. विद्या मिळण्याची इच्छा असेल तर सुखासीनता उपयोगी नाही. सुख मिळविणाऱ्यांना विद्या मोठ्या कष्टाने प्राप्त होते? विद्या मिळवताना सुख 'कसे मिळणार?
→ चिंतन-
तुमचे काम काहीही असो, तुमचा व्यवसाय काहीही असो, तो मन लावून आस्थापूर्वक उत्कृष्ट रीतीने करणे हीच समाजसेवा मन लावून म्हणजे मनाची एकाग्रता करून आपल्यातील सर्वस्व पणाला लावून निष्ठेने, आस्थेने आपण आपले काम करणे म्हणजेच समाव एक गरज चांगल्या पद्धतीने वेळेवर भागविण्यासारखे आहे. मग हे काम साधे मडकी बनविण्याचे असो अथवा मोट तयार करण्याचे, पाणी देण्याचे, मशीनवरील खिळे जुळविण्याचे असो किंवा स्वच्छता करण्याचे असो. साध्या कामातही समाजसेवा आहे, कारण एकटा सर्व गोष्टी करू शकत नाही.
कथाकथन -
'जागतिक आरोग्य दिन' : संयुक्त राष्ट्रसंघाने ७ एप्रिल रोजी साऱ्या जगात आरोग्यदिन साजरा करण्यात यावा, असा निर्णय | १९४८ मध्ये केला व त्यानुसार ७ एप्रिल १९४८ पासून दर वर्षी जगभर आरोग्य दिन साजरा केला जातो आहे. आपल्या देशातही या दिवशी नियमितपणे आरोग्य दिन साजरा करीत आहोत, आपल्या देशात पाच लाखांपेक्षा जास्त खेडी आहेत. अस्वच्छता हा आपल्या खेड्यांना मिळाल जणू शापच आहे. पिण्याचे पाणी, रोज वापरावयाचे कपडे आणि आपल्या शरीराची स्वच्छता कशी ठेवायची याचे योग्य ज्ञान ग्रामीण जनतेला त्यामुळे खेड्यांमधून रोगराईचा प्रसार मोठ्या वेगाने होत असतोः स्वयंपाक घर, स्वयंपाकाची भांडी, दुभती जनावरे व जनावरांचे गोठे यांची स्वच् ठेवण्याकडे ग्रामीण भागात विशेष लक्ष दिले जात नाही. अस्वच्छतेमुळे आपल्या शरीरात अनेक रोगांचा प्रादूर्भाव होतो, याचेही ज्ञान अडाणी लोकांन नसते. अंधश्रद्धेमुळे रोगोपचार न करता भलतेच उपाय करण्याकडे त्यांचा कल असतो. ग्रामीण जनतेचे आरोग्यविषयक अज्ञान दूर करण्यासाठी | आरोग्यदिनी प्रयत्न केले जातात. स्वच्छता व आरोग्य यांचा कसा निकटचा संबंध आहे, निरनिराळ्या रोगांचा फैलाव कसा होतो, तो कसा रोखावा औषधोपचार कसे केले जावेत याचे ज्ञान प्रदर्शनांतून, चित्रफितीद्वारे आरोग्य खात्याच्या वतीने ग्रामीण जनतेला या दिवशी दिले जाते. शाळे विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देऊन आपले आरोग्य चांगले कसे राखावे त्यासाठी चांगल्या सवयी कोणत्या याचे ज्ञान दिले जावे. आरोग्यान | नियम सर्वांनीच पाळले पाहिजेत. आपले शरीर, आपले कपडे, आपले घर व घराचा परिसर यांची स्वच्छता कशी राखावी याची प्रात्यक्षिके या दिवशी विद्यार्थ्यांच्या सहाय्याने करून दाखवावीत. वैद्यक क्षेत्रात अनेक नवनवे शोध लागलेले असल्याने मानवी आयुष्याच्या मर्यादित वाढ झालेले आहे. हे आता खेड्यातील सुशिक्षित वर्गालासुद्धा समजू लागले आहे. अंधश्रद्धांनी शारीरिक रोगांवर उपचार न होता, जिवावर बेतण्यातच त्याचे पर्यवसान होते, हे आता सुशिक्षितांना कळायला लागले आहे. आरोग्यविषयक जागृती प्रत्येक खेड्यातून व्हावी, हा आरोग्यदिनाचा प्रमुख उद्देश आहे.
→ सुविचार -
• Health is Wealth (आरोग्य हीच खरी संपत्ती आहे)
• Sound body sound mind (शरीर सुदृढ तर मन सुदृड )
→ दिनविशेष -
• पंडित रविशंकर यांचा जन्मदिन - १९२० प्रसिद्ध भारतीय सतारवादक वाराणसीत ७ एप्रिल १९२० जेसीर (बांगला देश) येथील जमीनदारी कुटुंब, वडील शामशंकर हे संस्कृत विद्यापारंगत. कॅलिफोर्निया येथील विद्यापीठात तत्वज्ञान शिक प्रख्यात नर्तक उदयशंकर हे रविशंकरांचे ज्येष्ठ बंधू होत. १९३० च्या सुमारास उदयशंकरांच्या नृत्यमंडळीत ते दाखल झाले. उस्ताद खाँ यांची तालीम त्यांनी १९३८ ते १९४४ या कालावधीत घेतली. ते इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन या संस्थेत दाखल झाले. १९४५ | त्यांनी नृत्यनाटिकांसाठी संगीतरचना केल्या. १९४७ साली 'इंडियन टेनेसेन्स आर्टिस्टस्' ही संस्था स्थापन केली. 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' नृत्यनाट्यांची संगीतयोजना त्यांनी केली - १९४८. ते दिल्लीच्या अखिल भारतीय आकाशवाणी वाद्यवृंदाचे संचालक होते - | त्यांनी भारतीय व पाश्चात्य संगीत पद्धतींना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नाने भारतीय शास्त्रीय संगीताचा देशाबाहेर | झाला. संगीत रचनाकार म्हणून त्यांनी केलेली कामगिरी ही भरीव आहे. त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानसन्मान लाभले. इंदिरा कलासंगीत विश्वविद्यालय रवींद्र भारती १९७३. बनारस हिंदू विश्वविद्यालय यांनी सन्माननीय डॉक्टरेट पदव्या देऊन त्यांचा गौरव केला. माय म्युझिक, माय लाईफ - १९६८ राग अनुराग (बंगाली) ही त्यांची आत्मचरित्रपर पुस्तकेही गाजली आहेत.
→ मूल्ये -
• सर्जनशीलता, सौंदर्यदृष्टी, कलाप्रेम
→ अन्य घटना -
सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा जन्म. - १५०६
• प्रसिद्ध इंग्लिश कवी विल्यम वर्डस्वर्थ यांचा जन्म. १७७०
• हेनरी फोर्ड निधन. १९४७
• जागतिक आरोग्य दिन.
→ उपक्रम
- १९४८ • डॉ. शंकर आबाजी भिसे 'भारताचे एडिसन' शास्त्रज्ञाचा स्मृतिदिन. - १९६५ -
• उपलब्ध वादकांचा एक छोटासा कार्यक्रम आयोजित करणे. • डॉ. शंकर आबाजी भिसे यांच्याबद्दल अधिक माहिती मिळविणे.
•
समूहगान •-
• धरतीची आम्ही लेकरं, भाग्यवान धरतीची आम्ही लेकरं...
→ सामान्यज्ञान -
• काही शास्त्रीय संगीत गायक : बेगम अख्तर, पं. ओंकारनाथ ठाकूर, बडे गुलाम अली खाँ, भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, उस्ताद अमीर खाँ, माणिक वर्मा, हिराबाई बडोदेकर इ.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा