1 जून दैनंदिन शालेय परिपाठ
→ प्रार्थना
गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे....
श्लोक
जो विषण्ण न दुःखांनी, ज्या सुखांत स्पृहा नसे । प्रेमक्रोधभयावीण मुनि तो स्थिरची असे ||
दुःखांनी जो खिन्न होत नाही, सुखाविषयी ज्याला विशेष आस्था नसते, ज्याने प्रेम, भय, कोष ही सर्व हृदयांतून हद्दपार केली आहेत, त्याला स्थितप्रज्ञ मुनि म्हणतात.
→ चिंतन
- अनेकदा मनुष्याच्या आयुष्यात निराशेचा अंधार पसरतो. जीवन जगणे कठीण वाटू लागते, अशा वेळी प्रयत्नांचा दिवा तेवत ठेवता तर जीवन जगण्याची गोडी मनात आपोआपच निर्माण होते. मग अशा प्रयत्नांनंतर हळूहळू यश मिळू लागते. त्या यशाच्या आनंदामुळे माणसाच्या मनातील निराशा देखील इच्छाशक्तीच्या जोरावर केलेल्या प्रयत्नांमुळे दूर पळून जाते. राजेंद्र खंडेलवाल या अपंग तरुणाने हिमालयातील खादुंग सारख्या खिंडीपर्यंत केलेला प्रवास याचे उदाहरण आहे.
कथाकथन
- 'घामाची झाली फुले' : रामायणातील एक लहानशी गोष्ट. रामचंद्र ज्या वेळी शबरीला भेटावयास आले, त्या वेळचा तो प्रसंग आहे. ज्या वनात राम बसले होते त्या वनात सर्वत्र फुले फुललेली होती. ती फुले कधीच कोमेजत नसत, सुकत नसत. त्यांचा सदैव मधुर गंध सुटलेला असे. राम शबरीला म्हणाले,“ ही फुले कोणी लावली?" शबरी म्हणाली, “रामा, त्याचा इतिहास आहे. ऐक. येथे मातंग ऋषींचा आश्रम होता. आश्रमात पुष्कळ विद्यार्थी असत. पावसाळा जवळ येत होता. पावसाळ्यात चार महिने पुरेल इतके जळण साठवून ठेवण्याची जरुरी होती. परंतु उन्हामुळे विद्यार्थी निघेनात. शेवटी मातंग ऋषी खांद्यावर कुल्हाड घेऊन निघाले. मागोमाग सारे विद्यार्थीही निघाले. सारे दूर रानात गेले. वाळलेली त्यांनी तोडली. मोठमोठ्या मोळ्या बांधल्या. त्या मोळ्या डोक्यावर घेऊन सारी मंडळी घामाघूम होऊन गेली होती. त्यांच्या अंगातून घाम गळत होता. थकल्यामुळे त्या दिवशी लवकर झोपी गेले. दुसऱ्या दिवशी पहाटे मातंग ऋषी आणि विद्यार्थी उठले, स्नानाला निघाले. एकदम सुगंध आला. मंद-मंद उपकालीन वान्याच्या बरोबर प्रसन्न वास येऊ लागला. विस्मयाने सर्व पाहू लागले. तसा सुगंध पूर्वी कधीही आला नव्हता. मातंग ऋषी म्हणाले, "जा रे पाहून या!" मुले हरिणाप्रमाणे उड्या मारीत निघाली. त्यांना काय दिसले? ज्या-ज्या ठिकाणी रानातून मोळ्या आणीत असताना घाम गळाला होता, त्या त्या ठिकाणी सुंदर फुले फुललेली त्यांना दिसली. रामा, ही घामातून निर्माण झालेली फुले आहेत. 'धर्मजानि कुसुमानि' शबरी म्हणाली. केवढे हे कष्टाच्या घामाचे महत्व
→ सुविचार • प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे
. • आधी कष्ट मग फळ.
→ दिनविशेष -
• हेलन केलर यांचा स्मृतिदिन - १९६८ : कठोर जिद्द आणि अथक परिश्रमांची मूर्ती अमेरिकेत जन्मलेली हेलन अंध, मुकी व बहिरी होती. पण निराशेने खचून न जाता उमेदीने या व्यंगावर मात करून जीवन जगण्याची प्रेरणा तिची शिक्षिका जैन सुलीव्हन हिने तिला दिल्ली. आपल्या शिक्षिकेच्या व आईवडिलांच्या प्रोत्साहनाने हेतनच्या मनात जिद्दीची ज्योत पेटली. स्पर्शसंवेदनेने शिकत हेउन पदवीधर झाली. इंग्लिश व जर्मन भाषेवर तिने प्रभुत्व मिळविले. जगभरच्या अंध लोकांमध्ये आपले उदाहरण पाहून नवा विश्वास निर्माण व्हावा म्हणून ती जगभर हिंडली. भाषणे दिली. अंधांची सेवा हेच तिने आपले जीवनकर्तव्य मानले. २७ जून १८८० ला जन्मलेली हेलन केलर डोळस लोकांना लाजवेल असे कार्य करून १ जून १९६८ रोजी मरण पावली.
→ मूल्ये
• प्रयत्नशीलता, कर्तव्यदक्षता, श्रमनिष्ठा.
→ अन्य घटना
- 'सुप्रसिद्ध मराठी कवी 'बी' यांचा जन्मदिन - १८७२
• प्रसिद्ध नाटककार, कवी, विनोदी लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे निधन - १९३४
• महाराष्ट्र राज्य परिवहन - शुभारंभ १९४८ (पुणे-नगर रस्ता) • शिवधर्माचे थोर विचारवंत प्रा.डॉ. आ.ह.साळुंके जन्म - १९४३
• गोवा प्रदेशाला स्वतंत्र राज्याचा दर्जा प्राप्त झाला - १९६१
• टाटा मुलभुत संशोधन संख्येची स्थापना-१९४५
• भारताचे माजी राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांचे निधन - १९९६ तुमच्या गावातील अंध, अपंग लोकांना, मुलांना हेलन केलरची माहिती सांगा.
→ उपक्रम -
• जवळपासच्या गावातील अंधशाळेला भेट देऊन तिथले कार्य समजून घ्या.
→ समूहगान
- बहू असोत सुंदर संपन्न की महा......
→ सामान्यज्ञान
सर्वसाधारणपणे माणसाचा मेंदू १.४ कि. ग्रॅ एवढ्या वजनाचा असतो.
• शरीरात असणाऱ्या अनेक वाहिन्यांची एकत्र लांबी मोजली तर ती सुमारे ६०,००० मैल (९६,५६०कि. मी.) एवढी
• माणसाच्या शरीरात असलेल्या हाडांची संख्या २०६ इतकी आहे.
• मानवी शरीरातील ज्ञानेंद्रियांपैकी डोळा हे एक महत्त्वाचे इंद्रिय आहे. डोळ्यामुळे प्रकाश, वस्तू, त्यांचे रंग, आकार व रूप, दोन वस्तूंमधील अंतर इ. गोष्टींचा बोध होतो.
भारतातील पहिल्या महिला
राष्ट्रपती-प्रतिभाताई पाटील
• पंतप्रधान- इंदिरा गांधी
• मुख्यमंत्री-- सुचेता कृपलानी
• राज्यपाल -सरोजिनी नायडू
• न्यायाधीश- बेगम फातिमा बीबी
आयपीएस- • किरण बेदी
स्त्रीवादी लेखिका-ताराबाई शिंदे
• संपादिका-तानुबाई बिरजे
• स्त्री शिक्षिका-सावित्रीबाई फुले, फातीमाबी
• एव्हरेस्ट सर करणारी -बचेंद्री पाल
अवकाशयात्री-कल्पना चावला
• मिस युनिव्हर्स-सुश्मिता सेन
• डॉक्टर-आनंदीबाई जोशी
• राष्ट्रमाता-जिजाऊ
• धर्मचिकित्सक -मुक्ता साळवे
• चित्रपट अभिनेत्री - देवीकाराणी
• महापौर-अरुणा असफअली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा