12 जून दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना
या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे....
→ श्लोक
- अपूर्वः कोऽपि कोशीयं विद्यते तव भारति । व्ययतो वृद्धिमायाति, क्षणमायाति संचयात् ॥
- हे भारती (विद्या देवते) तुझा (कोशोयं) खजिना काही आगळाच (अपूर्व) आहे. खर्च केल्याने (विद्या दुसऱ्याला शिकविल्याने) तो अधिक वाढतो, तर साठा केल्याने (न शिकविल्याने) क्षीण ( विसरत जातो) होतो.
→ चिंतन चिंतन हा उत्तम शिक्षक होय. माणसाने दिवसभरात एकदातरी अंतर्मुख होऊन चिंतन केले पाहिजे. चिंतनाने आपण स्वतःच स्वतःचे शिक्षक बनतो. विचारांच्या दृष्टीने स्वाद बनत जातो व मग समाजाच्या अनेकविध प्रश्नांवर योग्य प्रकारे विचार करून समाजास योग्य रीतीने मार्गदर्शन करण्याचे सामर्थ्य प्राप्त
कथाकथन
'सोन्याची धागर' एका गावात एक गरीब शेतकरी आपल्या कुटुंबासोबत राहत होता. आपल्या मालकीच्या जमिनीच्या छोट्याशा तुकडयावर त्याचा उदरनिर्वाह चाले. दिवसभर तो शेतात काम करी. तरीही तो समाधानी होता. असाच एके दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी तो शेती कामासाठी निघाला. शेतात नांगरणी करताना नांगराचा फळ जमिनीत अडकला. त्याने पाहिले तर फाळाजवळ एक धागर होती. आजूबाजूची मातीन त्याने ती घागर बाहेर काढली. पाहतो तर ती धागर चक्क सोन्याच्या मोहरांनी भरलेली होती. त्याने ती पुन्हा तेथेच पुरली आणि पुढची कामे करून आल्यानंतर त्याने ही हकीकत आपल्या पत्नीला सांगितली. पत्नीला शेतकन्याची खूप चीड आली. ती त्याला म्हणाली 'दैव देतं नि कर्म नेते असं म्हणतात ना. ते हेच. तुम्ही असं बेडद्यासारखं काय केलं? ती घागर घरी का आणली नाही?' यावर शेतकरी म्हणाला, 'जर ती घागर आपल्या नशिबात असेल तर ती आपल्यालाच मिळेल. त्याच वेळी गावातील दोन भुरटे चोर शेतकऱ्याच्या घराजवळून जात होते त्यांनी हे सारे ऐकले आणि शेतकन्याच्या शेतात जाऊन ती घागर शोधून काढली. घागर घेऊन ते पळाले. घरी जाऊन पाहतात तर कसल्या मोहरा अन कसलं काय? घागर चक्क सापांनी भरली होती. दोघांनी घागरीचे झाकण लावले आणि सकाळी धागर पुन्हा तेथे ठेवू या असे ठरवून झोपी गेले. इकडे शेतकरी सकाळी-सकाळी शेतावर गेला पण घागर शेतात नव्हती. त्याने ही गोष्ट पत्नीला सांगितली. पत्नी म्हणाली, कोण मूर्ख सोन्याने भरलेली घागर सोडणार आहे? कुणीतरी ती नेसी, आता बसा हरी विठ्ठल करीत. पत्नीचा राग अनावर झाला. न्याहारी आटोपल्यावर शेतकरी जेव्हा पुन्हा शेतात गेला त्याने पाहिले. घागर पुन्हा तेथे होती. शेतकऱ्याने यावेळी घागरीता हातही लावला नाही. तो मनातच म्हणाला, 'जर ही घागर माझ्या नशिबात असेल तर ती माझ्या घरापर्यंत आपोआप येईल. कारण सकाळी नसलेली घागर दुपारी पुन्हा शेतात दिसली म्हणजे यामागे कोणता तरी देवी हेतू असणार!' चोरांना मात्र शेतकऱ्याचा खूप संताप आला होता. त्यांनी पाहिले, शेतकऱ्याने घागर उचलली नाही. शेतकन्याला धडा शिकविण्याच्या हेतूने त्यांनी घागर रात्री शेतकऱ्याच्या दारात नेऊन ठेवली आणि झाडामागे आता शेतकरी धागर कधी उघडीत अन् त्यातील साप त्याला दंश कधी करतील असे म्हणत वाट पाहू पाहू लागले. शेतकरी नेहमी प्रमाणे शेतावर जाण्यासाठी | निघाला. त्याने पाहिले दारात तीच घागर. त्याने पत्नीला हाक मारली. दोघांनी घागरीचे झाकण उघडले. इकडे आता शेतकरी सर्पदंशाने मरणार म्हणून चोरांना खूप आनंद होत होता! आम्हाला फसवतो काय? पण झाले निराळेच! घागर सोन्याच्या मोहरांनी भरलेली होती. या अचानक मिळालेल्या दैवीकृपेने | शेतकऱ्याचे जीवन पालटले. तो आता श्रीमंत झाला होता. मुलं-बाळं आनंदात होती. तरीही त्याने साधी व समाधानी राहणी सोडली नव्हती. चोर मात्र दात -ओठ चावीत राहिले. जेथे देवाची कृपा असते, तिथे कोणाचे काहीच चालत नाही हेच खरे!
→ सुविचार
• कुणाचे चांगले करता येत नसेल तर वाईटही करु नका.
• आहे त्या परिस्थितीत सुख व समाधान माना. लोभ करु नका.
→ दिनविशेष
भारत सेवक समाजाची स्थापना - १९०५ : सतत २० वर्षे डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये अध्यापनाचे व्रत पूर्ण करुन ना. गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची १९०५ मध्ये स्थापना केली. दुःख निवारण, समाजसेवा, सहकार्याचा प्रसार, समाजशिक्षण जागृती ही त्याची उद्दिष्टे होती. या समाजाची स्थापना करून त्यांनी त्यागी; निरलस कार्यकर्त्यांना देशसेवेची एक सुवर्णसंधीच प्राप्त करून दिली. सुरुवातीस या संघटनेच्या मार्गदर्शनाची जबाबदारी त्यांनी स्वतःच पार पाडली. त्यांच्या पश्चात हे कार्य पेलण्याची धुरा श्रीनिवास शास्त्री यांनी वाहिली व त्यांच्या नंतर खूप काळापर्यंत पं. हृदयनाथ कुझरूंनी त्यांचे नेतृत्व केले. सदैव देशाची चिंता करणे व स्वतःजवळील उत्कृष्ट ते देशाला अर्पण करणे, स्वार्थी विचारांना थारा न देता जे मिळेल त्यात संतुष्ट राहून मोहापासून दूर राहणे, भांडणतंटा न करता खाजगी चारित्र्य निष्कलंक राखणे, पंथ जात याचा विचार न करता भारतीयांच्या हितासाठी झटणे व सामाजिक ध्येयाविरुध्द कोणतीही गोष्ट न करणे, ही भारतसेवक समाजाच्या कार्यकर्त्यांची व्रते होती. निदान ५ वर्षे समाजकार्याचा अनुभव घेतल्यावाचून कुणालाही समाजाचे सभासद होता येत नसे. या संस्थेपुढे स्वतःचे उदाहरण ठेवून गोखल्यांनी निस्वार्थी, मेहनती व देशकार्याला वाहून |घेतलेल्या कार्यकर्त्यांचा एक संघ तयार केला. पुढे हा समाज देशकार्यात अग्रणी ठरला.
→ मूल्ये
राष्ट्रप्रेम, आदरभाव, कर्तव्यदक्षता, बंधुता, सर्वधर्मसहिष्णुता.
→ अन्य घटना
• भारतीय गणिती व खगोल शास्त्रज्ञ आर्यभट्ट जन्मदिन - इ.स. ४७६
• साधनासिद्ध साहित्यिक भा. द. खेर यांचा जन्म - १९१७
• मराठी भाषेचे व व्याकरणाचे गाढे अभ्यासक कृष्णाजी पांडुरंग कुळकर्णी यांचे निधन - १९६४
→ उपक्रम
आपल्या शाळेतील गरजू मुलांना मदत करण्यासाठी 'शालेव स्नेह - मंडळ' निर्माण करा
. • ना. गोखल्यांचे रेखाचित्र काढून त्यांचे आदर्श गुण लिहून काचफलकावर लावा.
समूहगान
देश हमारा, निर्मल सुंदर उज्ज्वल गगन का तारा.....
→ सामान्यज्ञान • उंट हा पाण्यावाचून २ आठवडे राहू शकतो. उंटाला वाळवंटातील जहाज म्हणतात. • उंट एकाच वेळेस २५ गॅलन पाणी पिऊ शकतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा