Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, २२ जून, २०२४

19 जून दैनंदिन शालेय परिपाठ

 19 जून दैनंदिन शालेय परिपाठ



प्रार्थना 

तुम्ही हो माता पिता तुम्ही हो....


श्लोक - तस्मादसक्तः सततं कार्य कर्म समाचर । असक्तो हयाचरन् कर्म परमाप्नोति पूरुषः ॥ 

श्रीमद्भगवद्गीता वार : यास्तव (म्हणून तस्मात्) तू आसक्तरहित होऊन सतत कर्तव्य कर्म करीत रहा. कारण आसक्त न होता कर्तव्य करणारा मनुष्य श्रेष्ठ स्थान प्राप्त करतो. संस्कार :- आसक्त न होता कर्तव्य कर्म करीत राहावे.


 → चिंतन

  'विद्येनेच मनुष्या आले श्रेष्ठत्व या जगामाजी' - मनुष्याला सर्वश्रेष्ठ देणगी मिळाली आहे ती बुध्दीची. या बुध्दीचा उपयोग करून माणसाने अधिकाधिक ज्ञान व विद्या मिळविली पाहिजे. या विधेमुळेच निसर्गात मानवाने सर्वात जास्त प्रगती केली. तो श्रेष्ठ बनला व या साऱ्या विश्वाचा प्रमुख बनला. आपण अशी ही मनुष्याला श्रेष्ठ बनविणारी विद्या मिळवित राहण्यासाठी धडपडले पाहिजे. मनुष्य जीवनभर विद्यार्थी बनून नवनवे ज्ञान ग्रहण करीत राहीला तरच त्याच्या मनुष्यजन्माचे सार्थक आहे. नाहीतर त्याच्यात आणि पशुच्यात अंतर ते काय? विद्यादेवीची उपासना केल्याने ज्ञान मिळते. या ज्ञानाच्या प्रकाशाने आपले अवघे आयुष्य उजळून जाते.


→ कथाकथन

 'खऱ्या कमाईतील यश' फार प्राचीन काळी एक राजा होता. जवळच्याच जंगलात एक गरीब ब्राह्मण राहत असे. त्याला एक मुलगी होती. ती उपवर झाली होती. विवाह करण्यास पैसे नसल्याने पत्नीच्या सल्ल्यानुसार तो ब्राह्मण राजाकडे घन मागण्यास गेला. राजा उदार होता. त्याने दहा हजार रुपये दिले. ब्राह्मण म्हणाला, "हे फारच कमी आहेत." राजाने पुन्हा दहा हजार रुपये दिले. पुन्हा ब्राह्मण म्हणाला," हे फारच कमी आहेत.' असे ४-५ वेळा झाले. शेवटी राजाने संपूर्ण राज्य दिले. तरीसुध्दा ब्राह्मण, "हे फारच कमी आहे" असे म्हणाला. शेवटी दीनवाणे होऊन राजाला म्हणाला, आपण जे शुध्द धन मिळविले, त्यातील थोडे जरी दिले तरी माझ्याकरिता खूप आहे. तेच काम मला द्यावे." राजा म्हणाला, “ मी उद्या सकाळी आपणास असे धन देईन." त्यानंतर राजा रात्री दहा वाजता आपला वेष बदलून शहरात फिरावयास गेला. त्याला दिसले, संपूर्ण नगरातील लोक आपापल्या घरी सुखाने झोप घेत आहेत. परंतु एक लोहार मात्र अजूनही काम करीत आहे. राजा लोहाराजवळ गेला आणि म्हणाला," मी गरीब माणूस आहे. आपणाकडे | मला करण्यास योग्य असेल ते काम द्यावे." लोहार म्हणाला, “माझ्याजवळ एवढे काम आहे. जर तू सकाळपर्यंत हे काम करशील, तर मी तुला चार आणे देईन" राजाने ते काम तर केलेच, याशिवाय अर्धे काम जास्त केले. त्याबद्दल लोहाराने त्याला चार आणे दिले. चार आणे घेऊन राजा घरी आला आणि ठरल्याप्रमाणे ब्राह्मणास दिले. ब्राह्मण सुध्दा संपूर्ण राजपाट सोडून निव्वळ ते चार आणे घेऊन गेला व ते आपल्या पत्नीला दिले. ते पाहताच पत्नीला खूप राग आला. तिने ते चार आणे अंगणात फेकले. दुसऱ्या दिवशी अंगणात चार झाडे उगवली. त्या झाडांना रत्नांची फळे लागली होती. ब्राह्मणाने मुलीचे लग्न केले. तो राज्यातील सर्वात मोठा धनवान झाला. ही बातमी राजाच्या कानावर गेली. संपूर्ण नगर आणि राजा सुध्दा ती झाडे पाहण्यासाठी आला व आश्चर्य | करू लागला. ब्राह्मणाने राजासमोर ती झाडे उपटली व ते चार आणे दाखविले आणि सांगितले, “तुमची राजवट सोडून तुमची हीच इमानदारी आणि | कष्टाची कमाई मागितली होती. खरी कमाई सुरुवातीला फारच थोडी दिसते. परंतु पुढे ती माणसाला सर्व प्रकारचे सुख आणि शांती देत असते." 

 

→ सुविचार-

 • 'कष्टाचा आवाज शब्दांच्या आवाजापेक्षा मोठा असतो.

 ' • 'विद्वानांनी सत्यासत्याचे खरे स्वरुप मांडावे आणि सत्याचा स्वीकार व असत्याचा त्याग करुन आनंदात रहावे.' दयानंद



→ दिनविशेष

 फ्रेंच गणितज्ञ पास्कल जन्मदिन - १६२३ : या प्रसिध्द फ्रेंच गणितज्ञ व तत्वज्ञानी विद्वानाचा जन्म १९ जून १६२३ रोजी क्लेरमॉट फेरान येथे झाला. याचे शिक्षण घरीच झाले. भूमितीवर याने लहानपणीच हुकूमत मिळविती जगतिशास्त्र हा त्याच्या आवडीचा विषय होता. या संतुलनाविषयी त्याचा सिध्दांत प्रसिध्द आहे. 'चलनवलन' या विषयातही त्याची विशेष गती होती. याला धार्मिक जीवनाविषयी देखील आल्या होती. पोर्ट | रॉयल येथील धर्ममठात त्याने बरीच वर्षे चिंतनात व एकांतात घालविली. याचा 'लेटर्स टू ला प्रॉव्हिएन्शल' हा ग्रंथ फ्रेंच साहित्याच्या दृष्टीने विशेष महत्वाचा मानला जातो. 'पान्सिल' हा याचा प्रख्यात ग्रंथ त्याच्या मृत्यूनंतर ७ वर्षांनी प्रसिध्द झाला. याची शारीरिक स्थिती मात्र फार नाजुक होती. १९ ऑगस्ट १६६२ रोजी त्याचे अकालीच निधन झाले.


→ मूल्ये

 विज्ञाननिष्ठा, कर्तव्यदक्षता.


→ अन्य घटना

 • पुष्टीमार्गाचे प्रसिध्द संस्थापक वल्लभाचार्य यांचे निधन १५३१

  • नेताजी पालकरांचे शुध्दीकरण १६७६ 

  • कृषितज्ज्ञ प्रा. पां. चिं. पाटील जन्मदिन १८७७

   • पेशवाईतील मुत्सद्दी हरिपंत फडके यांचे निधन - १७९४

    • भारतातील सुप्रसिध्द गणिततज्ज्ञ व सांख्यिकीविज्ञ रामचंद्र बोस यांचा जन्म - १९०१


उपक्रम

• गणितातील मजेदार कोडी जमवून एक चिकटवही तयार करा.


समूहगान

 • चला जाऊ या दर्शन करुया अपुल्या भारतमातेचे.


→ सामान्य ज्ञान

 • महाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रे

  • भिवपुरी

 • कोयना 

 • खोपोली

 •  मिरा 

 •  भाटघर

 •   पोकळी

 •    राधानगरी

  • बेलदरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा