Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, २२ जून, २०२४

21 जून दैनंदिन शालेय परिपाठ

 21 जून दैनंदिन शालेय परिपाठ



→ प्रार्थना

- प्रार्थना देवा तुला, मिटू देरे बैर वासना.... 


→ श्लोक

 - यदि ह्ययं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः । मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः॥

 -  श्रीमद्भगवद्गीता भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, कारण (हे पार्था । (अर्जुना) मी जर आळस झटकून (अतन्द्रितः) कर्म चार : करीत राहिलो नाही तर लोकही सर्व प्रकारे माझाच मार्ग अनुसरतील. ते देखील आळशी होऊन कर्म करणार नाहीत. संस्कार :- थोर व्यक्ती आळस सोडून सतत कर्म करीत राहिल्या तर सामान्य जनसुध्दा 

 

→ चिंतन 

- 'हाताच्या पाच बोटांसारखे आपण राहीले पाहिजे.' - विनोबा भावे त्याचे अनुकरण करतील. हाताच्या पाच बोटांपैकी कुठलेच बोट दुसऱ्यासारखे नसते. पण तरीही एखादी वस्तू उचलताना ही पाचही बोटे एकत्र येतात. पाचच बोटे पण हजारो कामे करीत असतात. कारण एकत्र आल्यावर ती बोटे राहत नाहीत तर मूठ बनते. ही मूठ सामावूनही घेऊ शकते आणि ठोसा देऊन फेकूनही देऊ शकते. बोटे म्हणजेच माणसे व मूठ म्हणजे संघटना. जी शक्ती एकट्या माणसात नाही ती संघटनेत आहे. कृष्णासह गोपांच्या काठ्या लागल्या तेव्हा गोवर्धन उचलला गेला. संघटनेची शक्ती अपार आहे.


कथाकथन

 - 'उघड सत्य : संगीताची आवड असणारे एक कुटुंब होते. त्या कुटुंबातील एक लहान मूल फारच खेळकर होते. खेळताना ते संगीता वाद्ये ठेवलेल्या खोलीत आले, खोलीत सतार, पखवाज, तबला, बासरी अशी वाद्ये व्यवस्थित ठेवलेली होती. त्या मुलाने सतारीया या पि पखवाजावर बुक्क्याने मारले, तबल्यावर थापडा लगावल्या, समोर अनेक छिद्र असलेली बासरी पडलेली होती. तिला उचलून घेऊन ओटाला लावून पाहिली. काही वेळेने ते मूल तेथून निघून गेले. त्यांनंतर खोलीतील वाद्ये आपसात बोलू लागली. सतार म्हणाली, 'एक लहान मूल माझे कान ओवून गेले, असे का केले?" पखवाज म्हणाला, 'सतार, तू नेहमीच अकडून राहतेस म्हणून तुझे कान ओढले गेले.' सतार म्हणाली 'हे ठीकच झाले. माझा अकडबाजरा कळाला. परंतु तू मार का खाल्लास?" आता बासरी म्हणाली, ' बंधु पखवाज तू ढोल असला तरी आतून पोकळ आहेस आणि हा पोकळपणा बहुमूल्य वस्त्रांनी लपवून ठेवला आहे, तसेच तबल्याचे सुध्दा आहे. तोसुध्दा आतून पोकळच आहे. यासाठी पखबाज दादा तुम्हाला बुक्क्याचा मारा खाया आणि तबले भाऊ तुम्हाला चापटपुऱ्या खाव्या लागल्या,' असे बासरीने म्हटल्याबरोबर तिघेही एकदम तुटून पडताना म्हणाले, 'तुझ्यामधे असे कोणते गुण आहेत की तुझे त्या बालकाने आपल्या ओठाने चुंबन घेतले.' बासरी म्हणाली, 'मी सुध्दा तुमच्या प्रमाणेच पोकळ आहे. एवढेच नव्हेतर मला अनेक छिद्रे आहेत. परंतु मी आपला पोकळपणाच नव्हेतर स्वतःचे स्वरुपच झाकून ठेवले नाही. ते सर्वांनाच सहज दिसते.' 

 

→ सुविचार • ‘सत्य हे सूर्य प्रकाशाइतके उघड आहे. • सत्याच्या पुजाऱ्याने जमिनीवरील धुळीइतके विनम्र असले पाहिजे. सत्याचरणाने त्याची विनम्रता वाढत जाते.


 → दिनविशेष

  डॉ. हेडगेवार स्मृतिदिन - १९४० : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावाने विख्यात असलेल्या देशव्यापी संघटनेचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी २१ जून १९४० रोजी शेवटचा श्वास घेतला. अवघ्या एकावन्न वर्षाच्या आयुष्यात डॉ. हेडगेवारांनी आसेतुहिमाचल सान्या भारतभर सर्वांची हृदये एका सूत्रात ओवण्याचे जे काम केले त्याला जगाच्या इतिहासात तोड सापडणे कठीण आहे. डॉक्टरांनी कलकत्त्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन १९१४ मध्ये एल. एम. अँड एस. ही. पदवी मिळवली. नागपूरला येऊन व्यवसाय व सामाजिक कार्य दोन्हीस सुरुवात केली. प्रबळ संघटना नसणे हे या देशाच्या अवनतीचे कारण आहे हे त्यांच्या लक्षात आले. म्हणून निश्चयाने रोजच्या रोज एकत्र येणे, राष्ट्रीय विचारांचे चिंतन करणे फार आवश्यक आहे असे त्यांच्या मनाने घेतले आणि अशा प्रकारचा शिस्तबध्द कार्यक्रम असणारी एक संघटना उभारावी असा संकल्प त्यांनी केला. | १९२५ मध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर अवघ्या पाच स्वयंसेवकांनिशी त्यांनी 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची' स्थापना केली. संघटनेसाठी संघटना या प्रमुख तत्वावर आधारित या संघटनेकडे चारित्र्य आणि शुचितेचे आशास्थान म्हणून पाहिले जाते. 

  

→ मूल्ये

 • स्वाधीनता, कर्तव्यदक्षता, बंधुता, समता, राष्ट्रप्रेम, निर्भयता, शुचिता.



→ अन्य घटना 

उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस, या दिवसापासून दक्षिणायन सुरू होते. 

• कवी भूषण याने 'श्री शिवराजभूषण' हे दीर्घ काव्य पूर्ण केले - १६७४ 

• हिंदी - प्रचार संघाची स्थापना - १९३४ 

• सी. राजगोपालाचारी स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल झाले - १९४८ 


→ उपक्रम'

एकी हेच बळ' या कल्पनेवर आधारित कथांच्या लेखनाची स्पर्धा घ्या. • चांगल्या हस्ताक्षराच्या मुलांची संघटना करून टिपण- वह्या, फलकलेखन, तक्ते तयार करणे ही कामे शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करा. -


> समूहगान - 

• कदम कदम बढाए जा, खुशी के गीत गाये जा... 


→ सामान्यज्ञान

 - मराठी वाङ्मयातील पहिले

  • पहिली स्त्री कादंबरीकार साळुबाई तांबवेकर 'चंद्रप्रभा विरहवर्णन' - इ.स. १७६९

   • पहिले वृत्तपत्र - 'दर्पण'- संपादक बाळशास्त्री जांभेकर- इ.स. १८३२ 

   • पहिली सामाजिक कादंबरी- 'यमुना पर्यटन'- लेखक बाबा पद्मनजी - इ.स. १८६० शिलालेख शके ९०५ - -

    • पहिले उपलब्ध वाक्य - 'श्री. चावुण्डेरायें करवियले' श्रवणबेळगोळ

     • पहिला ग्रंथ - विवेकसिंधू - लेखक मुकुंदराज - शके १११०

      • पहिला गद्य चरित्रग्रंथ- 'लीला चरित्र' - म्हाईंभट्टांनी या ग्रंथात चक्रधर स्वामींच्या आठवणी समाविष्ट केल्या आहेत. शके १२०० 

      • आद्य कवियत्री महदंबा किंवा महदाइसा

       • पहिली स्त्री निबंधकार ताराबाई शिंदे-'स्त्री-पुरुष समानता' इ.स. १८८५ 

       • मराठीतील आद्य गीताभाष्य- 'ज्ञानेश्वरी' 

       • मराठी रंगभूमीवरील नाटकालचा पहिला प्रयोग 'सीतास्वयंवर'- इ.स. १८४३ - विष्णुदास भावे यांनी या नाटकाचा प्रयोग घडवून आणला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा