24 जून दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना
- ऐ मातृभूमि तेरे परणों में सिर नवाउँ.....
→ श्लोक
शंभो दमस्तपः शीचं क्षान्तिरार्जवमेव च । ज्ञानविज्ञानमास्तिक्यं ब्रम्हकर्म स्वभावजम् ॥ शौर्य तेजो मृतिर्दाक्ष्यं युध्दे चाप्यपलायनम् । दानमौश्वरभावश्च क्षात्रकर्म स्वभावजम्।। कृषिगोरक्ष्यवाणिज्यं वैश्यकर्मत्वभावजम् । परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्थापि स्वभावजम् ॥
- श्रीमद्भगवद्गीता मनाची शांती, इंद्रियनिग्रह, पवित्रता, सहिष्णुता, सरळपणा किंवा सत्यनिष्ठा, अध्यात्मज्ञान, विविधज्ञान श्रध्दा या गुणांनी युक्त अशी ब्राह्मणांची स्वाभाविक कर्मे असतात. पराक्रम, तेजस्विता, धैर्य किंवा मनाचा दृढनिश्चय, युध्दातून पळून न जाणे, दान,, औदार्य आणि प्रजेचे नेतृत्व हे "क्षत्रियाच्या कर्माचे गुण आहेत; हे क्षत्रियाचे स्वाभाविक कर्म होय. तर शेतकी, गुरे बाळगणे, व्यापार हे वैश्यांचे स्वभावजन्य कर्म होय. आणि तसेच दुसऱ्यांची सेवा करणे हे शूद्राचे स्वभावजन्य कर्म होय.
→ चिंतन
प्रयत्न करा यश मागे येईलच. - महर्षी कर्वे आपल्या संस्कृतीने नेहमीच कर्माचे महत्त्व सांगितले आहे. कर्म म्हणजे काम किंवा प्रयत्न. प्रयत्न करत राहणे हे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य करणाऱ्याला त्याचे योग्य ते फळ जरूर मिळते. आजवर जगाला आधुनिक युगात येईपर्यंत जे साहाय्य लाभले असे निरंतर प्रयत्न करणाऱ्या माणसांकडूनच ! अशा संशोधकांनी सतत प्रयत्न करुन नवे शोध लावले. अथक प्रयत्न करून कलाकारांनी यशाचे उंच मजले गाठले. भीमसेन जोशी, जयंत नारळीकर, शिल्पकार करमरकर हे अशा प्रयत्नशील माणसांपैकी काही, ज्यांच्या अपार प्रयत्नांवर प्रसन्न होऊन यशश्रीने त्यांना माळ
→ कथाकथन 'चारित्र्य' सचोटी, निस्वार्थीपणा, आत्मभान, निश्चित मत, धैर्य, निष्ठा आणि आदर या गुणांचं मिश्रण म्हणजे चारित्र्य. - | उत्तम चारित्र्यसंपन्न प्रसन्न व्यक्तिमत्व असणाऱ्या व्यक्तींची अनेक वैशिष्टये सांगता येतात. • असे लोक कुठेही उठून दिसतात. असे लोक कोणत्याही प्रसंगात आपला तोल क्यू देत नाहीत. शांत, आश्वासक, आकर्षक, आत्मविश्वासपूर्ण परंतु संयमित असं त्यांचं वर्तन असत.
•या लोकांचा | आत्मविश्वास जबरदस्त असतो. पण, त्यात उद्धटपणा नसतो. हे लोक दुसऱ्याच्या भावना समजवून घेतात. • असे लोक सबबी सांगत बसत नाहीत. असे लोक सभ्य असतात. शिष्टाचार पाळतात. त्यासाठी अनेक छोटे-मोठे त्याग करायला तयार असतात.
• हे लोक आपल्या आधीच्या चुकांपासून घडे | घेवून त्या चुका सुधारतात.
• असे लोक संपत्ती किंवा जन्मजात वारसा अशा गोष्टींची पर्वा करीत नाहीत.
• असे लोक कधीही दुसऱ्याचे वाटोळे करुन स्वतःचा फायदा करुन घेत नाही. असे लोक उच्चपदी असले तरी सर्वांशी मिळून मिसळून राहातात. असे लोक सामान्यांप्रमाणे राहूनही प्रतिष्ठितांच्यात सहज वावरतात. असे लोक ढोंगी वा दांभिक नसतात. असे लोक मृदुभाषी व प्रेमळ असतात. हसतमुख असतात. जुलमाविरुद्ध उभे राहण्यास ते सदैव सिध्द असतात. • हे म्हणजे तुमच्या कामगिरीला विजय प्राप्त करुन देणारा सुवर्णस्पर्श. हे लोक किमया करून दाखवतात. हे लोक सहज ओळखता येतात, पण त्यांची व्याख्या करणं अवघड असतं. हे लोक लीलया जबाबदाऱ्या स्वीकारतात. हे लोक म्हणजे मूर्तिमंत नम्रपणा. असे लोक जय आणि पराजय या दोहोंनाही सारख्याच उमदेपणानं सामोरे जातात.
• हे लोक नावलौकिक आणि संपत्ती यांच्या मागे धावत नाहीत. हे लोक म्हणजे शोभेची वस्तू नाही. हे लोक कणखर असतात.
• तकलादू नसतात. यांच्या व्यक्तिमत्वाची प्रसन्न अनुभूती पूर्णपणे शब्दात वर्णन करणं अशक्य असतं. हे लोक विनयशील असतात. पण, अगतिक वा दीनवाणे नसतात. हे लोक उच्च अभिरुचीचे असतात. छचोर वा उच्छृंखल नसतात. हे म्हणजे मूर्तिमंत स्वयंशिस्त आणि सौजन्य असे लोक स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर असतात. हे लोक विजयातही नम्र असतात आणि पराभवातही अविचल व धीरगंभीर असतात. चांगल चारित्र्य म्हणजेच यश असतं. मुलांनो वरील वैशिष्टये अंगी जोपासा व उत्तम चारित्र्यसंपन्न व्हा. सुविचार
• 'शूर माणसानं नम्र, धनिक माणसानं निगर्वी, ज्ञानी माणसानं शांत, तपस्व्यानं क्षमाशील, धार्मिक माणसानं सज्जन आणि उदार माणसाने विवेकी असणं हे त्यांचं भूषण आहे. तेव्हा सर्व माणसांच्या बाबतीत चरित्र्य किंवा सदाचार हे सर्वश्रेष्ठ भूषण आहे.' (शीलं परं भूषणम्- भर्तृहरि) "चित्र ही हाताची कृती आहे तर चरित्र ही मनाची कृती आहे.' 'आपले काम जवाबदारीने आणि प्रामाणिकपणे करणे हाच सर्व सन्मानांचा मार्ग आहे. शेक्सपिअर
दिनविशेष
• भारताचे माजी राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांचा स्मृतिदिन - १९८० : गिरींचा जन्म १० ऑगस्ट १८९४ रोजी झाला. ते शाळेत शिकत असतानाच ना. गोखले यांनी राष्ट्रीय निधीची व लो. टिळकांनी पैसा फंडाची योजना सुरु केली होती. या कार्यात छोट्या गिरीने हिरिरीने भाग घेऊन मदत मिळवून दिली. आपल्या मुलाने नामांकित वकील व्हावे म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना आयर्लंडमधील डब्लिन विद्यापीठात बॅरिस्टर होण्यासाठी धाडले. 'चुकूनही मांसाहार करणार नाही.' हे आईला दिलेले वचन त्यांनी निग्रहाने पाळले. आयर्लंड हा देश ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी धडपड करीत होता. तेथील तरुण सशस्त्र उठावाच्या हालचाली करीत होते. भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे असेल तर भारतात सुध्दा सशस्त्र उठाव झाला पाहिजे, हे जाणून भारतीय तरुणांनी आयर्लंडमध्ये गुप्त संघटना उभारली. यात गिरी क्रियाशील कार्यकर्ते होते. बॅरिस्टर होऊन गिरी भारतात परत आले पण त्यांनी फक्त पाचच वर्षे वकिली केली. गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकाराच्या चळवळीत त्यांनी स्वतःला झोकून दिले. स्वातंत्र्यानंतर निरनिराळ्या घटक राज्यात मिळून ११ वर्षे ते राज्यपाल होते. १९६७ साली उपराष्ट्रपती पदावर त्यांची निवड झाली. तर १९६९ साली ते राष्ट्रपती झाले. २४ जून १९८० रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
→ मूल्ये
स्वाधीनता, समता, बंधुता, निर्भयता.
→ अन्य घटना
• राणी दुर्गावतीचे बलिदान - १५६४
→ उपक्रम
• भारताच्या राष्ट्रपतींची नावे व त्यांचा कार्यकाल लिहिलेले तक्ते तयार करा.
समूहगान -
→ • ये देश है वीर जवानों का, अलबेलों का मस्तानों का...
→ सामान्यज्ञान
भारतातील साहित्य क्षेत्रात दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार 'ज्ञानपीठ पुरस्कार' होय. १९८४ पासून मध्यप्रदेश सरकारने सुगम संगीतासाठी 'लता मंगेशकर' पुरस्कार सुरू केला. भारत सरकारतर्फे दरवर्षी प्रत्येक खेळातील उत्कृष्ट खेळाडूस 'अर्जुन पुरस्कार' दिला जातो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा