Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, २४ जून, २०२४

25 जून दैनंदिन शालेय परिपाठ

 25 जून दैनंदिन शालेय परिपाठ



प्रार्थना

 देव दयेचा अथांग सागर, विश्वचि मानी तो अपुले घर.... 

 

→ श्लोक

 - वंदे मातरम् । सुजलां सुफलाम् मलयजशीतलाम । सस्यशामलाम् । मातरम् । वंदे मातरम् ॥ शुभ्रज्योत्स्नां - पुलकीत - यामिनीम् । फुल्लकुसुमितद्रुमदल - शोभिनीम् ॥ चार : सुहासिनीं, सुमधुर भाषिणीम् । सुखदां वरदां मातरम् । वंदे मातरम् ॥ बंकीमचंद्र चटोपाध्याय 

 - हे भारत माते, तुला आम्ही वंदन करतो. तू उत्तम जलांनी संपन्न असलेली, उत्तमोत्तम फळांनी समृध्द बनलेली, मलयगिरीवरील चंदनाच्या बनातून वाहात येणाऱ्या सुगंधीत वाऱ्यांनी शांत शीतल झालेली आणि सर्व प्रकारच्या पिकांनी सतत हिरवीगार दिसणारी आहेस. हे मातृभूमि, तुला आम्ही चंदन करतो. हे भारतमाते, रात्रीच्या शुभ्रधवल चांदण्याने तू रोमांचित होत असतेस. फुलांनी डवरलेल्या वृक्षराजीमुळे तू शोभायमान दिसतेस. तू नेहमीच प्रसन्न राहतेस. तू मधुर भाषण करणारी आहेस. तू आम्हाला सदैव सुख देत असतेस; आमच्या सर्व आशाआकांक्षा पूर्ण करतेस. हे माते. तुला आम्ही वंदन करतो. 

 

→ चिंतन 

- 'वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्' जय- जिजाऊ ( जय सावित्री स्वातंत्र्य हा एकच ध्यास लागलेल्या क्रांतिकारकांच्या तोंडी अत्यंत पवित्र दोनच शब्द होते ते म्हणजे वंदे मातरम्. माझ्या मातृभूमीला माझे वंदन असो. वेदमंत्र उच्चारताना माणसाचे मन जितके एकाग्र होत असे तितक्या एकाग्रतेने भारतीय क्रांतिकारकांनी देशभक्तीचे व्रत पाळले. या व्रताच्या यज्ञकुंडात स्वतःच्या प्राणांचीही प्रसंगी आहुती दिली. या दोन शब्दांचे पावित्र्य जपण्यासाठी त्यांनी आपल्या छातीची ढाल केली. आज अभिमानाने हे गीत म्हणत असताना त्या अभिमानास्पद भूतकाळाची आठवण हृदयात जागी ठेवायला हवी. 



→ कथाकथन 

- 'आपल्यावरून जग ओळखावे' सुमारे पाच सहाशे वर्षांपूर्वी मुसलमान आणि ख्रिस्ती लोकसहाशे वर्षांपूर्वी मुसलमान आणि ख्रिस्ती लोक यामध्ये कडाक्याचे युद्ध चालले होते. एका लढाईत तुर्क लोकांचे ५०० शिपाई ख्रिस्ती लोकांनी कैद केले आणि त्यांना बाजारात नेऊन गुराप्रमाणे विकून टाकले, अशा त्यापैकी अहमद नावाच्या गुलामास एका ख्रिस्ताने शंभर होनांस विकत घेतले. तो मनुष्य अहमदाला आपल्या घरी बैलप्रमाणे राबवीत असे. धनी देईल ते खावयाचे आणि सांगेल ते काम करावयाचे. काम करण्यास चुकले की चाबकाचे फटके खावयाचे, असा राक्षसी छळ त्याने म्हातारपणापर्यंत सोमिला. पुढे त्याच्याच्याने काम होईनासे झाले. म्हणून धन्याने त्याला दुसऱ्या एका ख्रिस्त्यास विकले. तेथेही त्याच्या नशिबी तेच. त्याला त्या गुलामगिरीचा जाच सहन होईनासा झाला. रोज तो धाव धाव रडे आणि परमेश्वराची प्रार्थना करी, की 'हे देवा, असली खडतर गुलामगिरी तू कोणाच्याही नशिबी लिहू नकोस !" अशा स्थितीत काही दिवस लोटल्यावर एका दयाळू मनुष्याला अहमदचा कळवळा आला. तेव्हा त्याने त्याला विकत घेतले. आणि उलट त्याच्याजवळ ५०० होन देऊन त्याला सोडून दिले. अहमदाने त्या मनुष्याच्या उदारपणाबद्दल त्याचे मनापासून आभार मानले आणि त्याच्या पाया पडून तो घरी निघाला तो जो निघाला तो प्रथम बाजारपेठेत गेला, तेथे एका दुकानात पोपट, मैना, काकाकुवा वगैरे अनेक पशुपक्षी पिंजऱ्यात घालून विकण्याकरिता ठेवले होते. दुकानदाराजवळून त्याने सर्व पक्षी विकत घेतले आणि लागलीच त्यांना सोडून दिले. हे त्याचे चमत्कारिक दिसणारे कृत्य पाहून दुकानदार त्यास विचारतो. 'काय हो, तुम्ही या पक्ष्यांना हौसेने पाळण्यांचे सोडून देऊन त्यांना सोडून का बरं दिले? अहमद म्हणाला, 'शेटजी, तुम्हाला गुलामगिरीचा खडतर अनुभव नाही म्हणून तुम्ही असं विचारता, मी गुलामगिरीत सबंध जन्म काढला आहे. तुम्ही या पक्ष्यांचा जन्मसिद्ध हक्क हिरावून घेत आहात, हे मला पहावेना, म्हणून मी त्यांना सोडून दिले ! हे ऐकून दुकानदाराचे तोंड बंद झाले. 



→ सुविचार

 • सत्य आणि न्याय याहून कोणताही धर्म मोठा नसतो. म. गांधी

  • जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात, त्यांना स्वतःला स्वांतत्र्यात राहण्याचा अधिकार नाही- अब्राहम लिंकन

   • दिव्याने दिवा लावत गेलां कि दिव्याची एक माळ तयार होते. फुलाला फुल जोडत गेलं कि फुलांची माळ तयार होते. माणसाला माणूस जोडत गेलं कि माणूसकीचं एक सुंदर जग तयार होते. आणि शब्दाला शब्द जोडत गेलं कि साहित्यकृती तयार होते उत्तम.


दिनविशेष - 

• 'वंदेमातरम' चे जनक बंकिमचंद्र चटर्जी जन्मदिन - १८३८ बंकिमचंद्र चटनी ते राष्ट्रगीताचे जनक म्हणून. बंकिमचंद्रांनी लिहिलेली ही एकमेव कविता, त्यांच्या आनंदमठ कादंबरीत शब्दांकित झाली आहे साहित्याचे एक प्रवर्तक होते. विद्यार्थीदशेतच सुरु झालेले त्यांचे लेखन जीवनाच्या अखेरपर्यंत सतत सुरु होते. ते एकम प्रसिध्द होते. १८५८ मध्ये कलकत्ता विद्यापीठातून जे पहिले दोन पदवीधर बाहेर पडले. त्यात बंकिमचंद्र होते. त्यानंतर डेप्युटी | होईपर्यंत त्यांनी विविध सरकारी हुद्यांवर काम केले. १८७२ साली त्यांनी 'बंगदर्शन' हे बंगाली नियतकालीक सुरु केले. प्रे राष्ट्राभिमान जागा करण्याच्या हेतूने सुरु केलेल्या या नियतकालिकामुळे बंगाली नियतकालिकाचे प्रभावी पर्व सुरु झाले. अनेक नवे उपल आले. रवींद्रनाथांनाही बंकिमचंद्रांनी साहित्यसाधनेसाठी प्रोत्साहन दिले. शुद्ध भाषा व बोली भाषा यांचा सुंदर संगम करून किमान वे वळण लावले व सामर्थ प्राप्त करुन दिले. आपली पहिली कादंबरी इंग्रजीत लिहीली. पहिली बंगाली कादंबरी दुर्गेशनंदिनी ही असून नंतर त्यांनी मृणालिनी, विषवृक्ष, चंद्रशेखर, आनंदमठ इ. अनेक कादंबऱ्या लिहील्या. बंगाली साहित्यात विनोदही बकिमचंद्रांनीच आणला. 'कमलकांतेर दातेर मधील विनोदगर्भ वैचारिक लेखही प्रसिध्द आहेत. २५ जून १९३८ रोजी त्यांची जन्मशताब्दी मोठ्या प्रमाणावर बंगालमध्ये साजरी केली गेली होती.एप्रिल १८९४)


→ मूल्ये 

स्वाधीनता, कर्तव्यदक्षता.


अन्य घटना

 इंग्लंडमध्ये झालेल्या क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिजचा पराभव करुन भारताने विश्वचषक जिंकला - १९८३. 

 

→ उपक्रम

 • सुप्रसिध्द बंगाली लेखकांची व त्यांच्या पुस्तकांची नावे मिळवून फलकावर लिहा.


> समूहगान -

 • जहाँ डाल डाल पर सोने की चिडीयाँ करती हैं बसेरा... 

 

→ सामान्यज्ञान -

 • राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज.

 •  वि.वा.शिरवाडकर - कुसुमाग्रज. 

 • कृष्णाजी केशव दामले - केशवसुत.

 •  प्रल्हाद केशव -अत्रे केशवकुमार.

  • त्र्यंबक बापूजी ठोंबरे - बालकवी.

 • नारायण मुरलीधर गुप्ते बी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा