26 जून दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना
सृष्टिकर्ता ईश प्यारे, एक हो तुम एक हो....
श्लोक -
आयुः सत्वबलारोग्यसुखप्रीतिविवर्धनाः । रस्याः स्निग्धाः स्थिराः हृद्याः आहाराः सात्विकप्रियाः ॥ कट्वम्ललवणात्युष्णतीक्ष्ण रुक्ष विदाहिनः । आहारा राजसस्येष्टा दुःखशोकामयप्रदाः ।। याययामं गतरसं पूति पर्युषितं च यत् । उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियम् ॥
- श्रीमद्भगवतगीता सात्विक मनुष्यांना, आयुष्य वाढविणारे, सत्वशुद्धि करणारे, बल आरोग्य, सुख आणि तृप्ति देणारे, रसयुक्त, स्निग्ध, स्थिर राहणारे आणि मनाला आनंद देणारे आहार आवडतात. राजस मनुष्यांना कडु, आंबट, खारट, अति उष्ण, तिखट, रुक्ष म्हणजे शुष्क आणि दाहकारक असे हे दुःख, शोक आणि रोग उत्पन्न करणारे आहार, प्रिय असतात. तामस मनुष्यांना, तीन तासांपूर्वी शिजवलेले बेचव, दुर्गंधीयुक्त उष्टे आणि अपवित्र अन्न आवडणारे असते.
→ चिंतन
'वेळेवर घातलेला एक टाका नंतरचे दहा टाके वाचवतो.' कुठल्याही गोष्टीत काळजीपूर्वक काम करणे जरुरीचे असते. बेजबाबदारपणाने वागल्याने आपले भरून न येण्याइतके नुकसान होते. जर अंगातील कपडा थोडासा फाटलेला असला तर त्याला एक टाका घातला नाही तर मग तो कपडा अधिक फाटत जातो आणि दहा टाके घालायची वेळ येते. पालकांनी आपल्या मुलांच्या वागण्याकडे असेच काळजीपूर्वक लक्ष दिले तर नंतर तो वाईट मार्गाला लागल्याचे दुःख त्यांना भोगावे लागत नाही.
कथाकथन
- 'छत्रपती शाहू महाराज' : (सर्व सद्गुणांचा उपासक) छत्रपती शाहू महाराज आणि भारताचे स्वातंत्र्य यांचे अतूट नाते आहे. छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ मध्ये कागल थोरली पातीचे जहागीरदार श्रीमंत जयसिंगराव घाटगे यांच्या घराण्यात झाला. ते छत्रपती झाले. कोल्हापूरच्या महाराणीने त्यांना दत्तक घेतले. राजकोट येथील संस्थानिकांच्या मुलांसाठी असलेल्या विद्यालयात त्यांचे शिक्षण झाले .तेथील फ्रेझर या गुरूच्या शिक्षणाचा त्यांच्यावर प्रभाव पडला. २ एप्रिल १८९४ मध्ये त्यांनी कोल्हापूरच्या प्रशासनाची सूत्रे हाती घेती. २६ जुलै १९०२ बहुजनांसाठी शाहू महाराजनांनी आरक्षण लागू केले. २८ वर्षाचा कालावधी त्यांनी कोल्हापूरचा कायापालट करण्यात घालविला. १९२२ साली त्यांनी इहलोक सोडला. त्या काळात देशभर कडवे क्रांतिकारक थंड करण्याच्या तयारीत होते. इंग्रज सशस्त्र होते. विवेकानंदांची व्याख्याने अमेरिकेत गाजत होती. पण हा छत्रपती गोरगरिबांचा, दीनदलितांचा राजा होता. विद्वानांचा चाहता होता. कलावंतांचा त्राता होता, समाजसुधारकांचा दाता होता, शिक्षणाचा भोक्ता होता, स्थिर चित्ताने धोरण आखणारा नेता होता. उच्चवर्णीय समाजाच्या गुलामगिरीतून गरीबांना मुक्त करणारा सत्ताधीश होता. त्याने क्षात्रजगद्गुरूचे धर्मपीठ स्थापन किले. कुलकर्णी वतन नष्ट करून तलाठीपद निर्माण केले. बलुतेपद्धती नष्ट केली. पूर्वाश्रमीकाच्या गुन्हेगारांना मुक्त केले, प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. ठिकठिकाणी वसतिगृहे उभारली. तळगाळातील लोकांना मायेचा स्पर्श दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर परदेशातून परत आले तेव्हा या दलित विद्वानाच्या भेटीसाठी उत्सुक असलेला हा राजा परळला सिमेंटच्या चाळीत त्यांना भेटायला गेला. कोल्हापुरात बोलवून त्यांचा त्यांनी मोठा सत्कार केला. त्याचे व्यक्तिमत्त्व लोकोत्तर होते. कलाप्रेम अगाध होते. माधवराव बागल, प्रबोधनकार ठाकरे, कर्मवीर भाऊराव पाटील, बाल गंधर्व, बाबूराव पेंटर, गोविंदराव टेंबे, भालजी पेंढारकर, केशवराव भोसले, अब्दुली करीम खाँ, शंकरराव सरनाईक अशा गुणसंपदेचा मेळा कोल्हापुरात महाराजांनी निर्माण केला. त्यांच्या सर सामाजिक, शैक्षणिक, व सांस्कृतिक कर्तृत्वाची नोंद केंब्रीज विद्यापीठाने घेतली. त्यांना एल. एल. डी. ही सन्माननीय पदवी बहाल केली. राजाचे नाव जगभर झाले. ६ मे १९२२ हा स्मृतिदिन.
→ सुविचार-
• शील घडविणारे, मनाची शक्ती वाढविणारे, बुद्धीचा विकास करणारे आणि मनुष्याला स्वावलंबी बनविणारे, असे शिक्षण आपल्याला हवे शिक्षण त्यालाच म्हणावे की, जे प्राप्त झाल्याने लोक विनम्र, परोपकारी, सेवाभावी आणि कार्यतत्पर होतात.
दिनविशेष
- • जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन -: जगात जसजशी भौतिक सुखाची रेलचेल झाली तसतसे माणसाचे मन अधिकाधिक सुखाकडे धाव घेऊ लागले. एकीकडे पैसे मिळवण्याची लालसा वाढली, तर दुसरीकडे सुखाचा उपभोग विकृत पध्दतीने घेण्याची प्रवृत्ती वाढीस लागली. या विकृतीच्या विख्यात सापडलेल्या जगातील अनेक तरुणांची सुटका करण्यासाठी वेगवेगळ्या संस्था जिवापाड परिश्रम करीत आहेत. वेगवेगळ्या शहरात केल्या जाणाऱ्या अशा अंमली पदार्थ निषेध प्रयत्नातून २६ जून हा जागतिक अंमली पदार्थ निषेध दिन म्हणून पाळला जाण्याची कल्पना पुढे आली. या दिवशी सरकारी तसेच खाजगी संख्या, ज्या व्यसनमुक्तीचे काम करीत आहेत. वेगवेगळी पथनाट्ये, समूहनाट्ये, समूहगीते अशा माध्यमातून लोकांना अंमली पदार्थाचे दुष्परिणाम प्रभावीपणे समजावून सांगतात व त्यांना दारू, चरस गांजा, ब्राऊन शुगर अशा अंमली पदार्थांच्या भयानक आकर्षणापासून दूर राहण्याचे आवाहन करतात. पुण्यात येरवड्यानजीक चालविली जाणारी 'मुक्तांगण' ही संस्था डॉ. अनिता अवचट यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली अशा प्रकारचे समाजोपयोगी काम अनेक वर्षे करीत आहे.
मूल्ये
बंधुता, समता, निर्भयता
• राजर्षी शाहु महाराज जयंती - १८७४
→ अन्य घटना राजर्षी शाहू महाराज जयंती १८७४
• बालगंधर्व तथा नारायण श्रीपाद राजहंस यांचा जन्म १८८८. रसायन शास्त्रज्ञ डॉ. प्रफुलचंद्र राय यांचे निधन - १९४४. युनोची स्थापना - १९४५. पुणे महापालिकेला कारभार मराठी भाषेतून करण्याच्या ठरावाला मंजुरी दिली गेली - १९५८.
• पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराचे उद्घाटन - १९६८. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली १९७५.
• एअर इंडियाचे बोइंग विमान गौरीशंकर कोसळले - १९८२.
→ उपक्रम
आपल्या आसपासच्या वस्त्यांमधून अंमली पदार्थाचे दुष्परिणाम दाखवणारी पथनाट्ये सादर करा. आपल्या शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी अशा प्रकारचे एक छोटेसे नाटक सादर करा.
→ समूहगान
ऐ मेरे वतन के लोगों, तुम खूब लगा लो नारा...
→ सामान्य ज्ञान
• सूर्य मंदिर कोणार्क(ओरिसा).
• गुलाबी शहर जयपूर (राजस्थान). अफू अफूच्या झाडांना आलेल्या कच्च्या बोंडांना पाडलेल्या चिरांतून पाझरलेल्या व वाळून घट्ट झालेल्या रसाला 'अफू' म्हणतात. हा एक मादक विषारी पदार्थ आहे. नशेसाठी अफू सेवन केल्यावर पुनः पुन्हा तिची इच्छा होऊन मनुष्य व्यसनात गुरफटला जातो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा