28 जून दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना
ए मालिक तेरे बंदे हम, ऐसे हो हमारे करम....
→ श्लोक
सुहृन्मित्रार्युदासीनमध्यस्थ व्देष्यबन्धुषु । साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते ॥
मनुष्याची आणखी अधिक प्रगति झाली असे तेव्हा समजावे की जेव्हा तो सर्वांशी म्हणजे प्रामाणिक, हितैषी, मित्र आणि वैरी, हेवेखोर, सज्जन, दुर्जन आणि जे उदासिन व निःपक्षपाती आहेत त्यांच्याशी समबुध्दीने वागतो. श्रीमद्भगवतगीता
→ चिंतन
कोणताही सद्विचार किंवा कल्पना तुमच्या चित्तात उगम पावली तर तिचा पाठपुरावा केल्याशिवाय राहू नका. या कामी धरसोड उपयोगार्थी नाही. अशा धरसोडीने दानत बिघडते. आपल्या विचारांना सदासर्वदा एकसारखे चिकटून रहावे, मोठ्या धीराने ही लढाई एकसारखी चालविली पाहिजे. यात केव्हाही मागे तोंड फिरवू नये. अशा निश्चयाने आणि धीमेपणाने, धीराने तुम्ही चालला तर आज ना उद्या ज्ञानरवीचा उदय झाल्यावाचून राहणार नाही स्वामी विवेकानंद
→ कथाकथन
व्यक्तिमत्व विकास :- ज्या गोष्टी आपण पाहतो, ऐकतो, वाचतो त्याचा परिणाम मनावर होत असतो. त्यातून 'उत्तम ते घ्यावे' हे मनाला गांव वाईट यात फरक आपण बुध्दीने ओळखतो. त्यातील चांगुलपणा' मनावरील परिणाम म्हणजे संस्कार होय. अशा सं व्यक्तिमत्व विकास होत असतो. संस्कार या शब्दाबरोबर विकार हा शब्द ऐकतो. विकार म्हणजे व्यक्तिमात्राच्या ठिकाणी जे असू नये ते 'भाव' ! राग, व्देष, मोह, मद, लोभ, मत्सर हे मनाचे विकार आहेत. ते वाढू न देणे, त्यांना आवर घालणे, मनावर संयम ठेवणे इ. व्यक्तिमत्व विकासाला पोषक ठरणाऱ्या गोष्टी आहेत. 'अभिमान' ही देखील मनाची एक प्रवृत्ती आहे. स्वभाषेचा, स्वदेशाचा आपले म्हणून जे आहे त्याचा अभिमान असावा, स्वाभिमान असावा, पण कोणत्याही प्रकारे दुराभिमान असू नये. प्रेम, सहानुभुती, दया, माया इ. मनोधर्माची प्रवृत्ती आहे. दुसऱ्याच्या सुख, दुःखात सहभागी होणे, गरजूंना मदत करणे, समाज-देशावर संकट आ असता धावून जाणे, त्याग भावना असणे, उदार दृष्टीकोन असणे इ. व्यक्तिमत्व विकासाची अंगे आहेत. निर्भयता, कर्तव्यदक्षता, उद्योगशीलता ह्या गुणामुळे व्यक्तित्व अधिक प्रभावी बनते. या उलट आळस, अंधश्रध्दा, अकर्मण्यता, केवळ चैन करण्याची प्रवृत्ती ह्या गोष्टी व्यक्तिमत्व विकासाला बाधक ठरतात. तेव्हा चांगल्या गुणांचा स्वीकार व वाईटाला नकार देण्याची सवय मनाला लावायला पाहिजे. त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होईल. याक्तिमत्व विकासाच्या संदर्भात आपल्या स्वभावाला मनाला चांगले वळण लागावे म्हणून आपल्याला खालील बाबी महत्वाच्या वाटतात
(१) उत्तम ध्येय समोर ठेवावे ते साध्य करण्याकरता सतत प्रयत्नशील असावे.
२) उत्तम पुस्तकांचे विशेषतः ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक, चरित्रात्मक पुस्तकांचे नियमित वाचन करावे.
३) एखादा नियम करावा व निश्चयाने त्याचे पालन करावे.
४) 'सुसंगति सदा घडो' यातले मर्म ओळखून चांगल्या मित्रांच्या संगतीत रहावे.
५) आपली चूक असेल तर ती मान्य करावी, केवळ दुसऱ्यावर दोषारोपण करून समाधान मिळवू नये.
६) चांगल्या गोष्टीचे, सवयींचे अनुकरण कराये, वाईटाकडे धावणाऱ्या मनाला आवर घालावा.
७) दुसऱ्याची चूक असेल तर ती चांगल्या भाषेत समजाऊन सांगावी.
(८) आपली अभिरुची (आवड) संपन्न असावी. त्या करिता चांगल्या वाईटातला फरक ओळखायला शिकावे.
९) एखादा सुंदर छंद जोपासावा.
(१०) काही नित्य पाठाची सवय लावावी. सुविचार जो विचारी आहे तो तत्वज्ञ आहे, जो विकारी आहे तो बेकार आहे. आत्मचिंतन, आत्मपरिचय, आत्मविश्वास, आत्मसंयम, आत्मसन्मान, आत्मनिर्भय, आत्माभान, आत्मभिमान, आत्मनिष्ठा, आत्मज्ञान ही व्यक्तिमत्व विकासाची महत्वाची अंगे आहेत. • उद्योगाने कार्य सिध्द होते, मनोरथांनी नाही.
सुविचार
• जो विचारी आहे तो तत्वज्ञ आहे, जो विकारी आहे तो बेकार आहे.
• आत्मचिंतन, आत्मपरिचय, आत्मविश्वास, आत्मसंयम, आत्मसन्मान, आत्मनिर्भय, आत्माधान, आत्मभिमान, आत्मनिष्ठा, आत्मज्ञान ही व्यक्तिमत्व विकासाची महत्वाची अंगे आहेत.
• उद्योगाने कार्य सिध्द होते, मनोरथांनी नाही
. → दिनविशेष
• महालनोबिस प्रशांतचंद स्मृतीदिन १९७२ : या प्रसिध्द भारतीय संख्याशास्त्रज्ञाचा जन्म २९ जून १८९३ रोजी झाला. यांचे शिक्षण कलकत्ता विद्यापीठात झाले. पुढील शिक्षणासाठी ते केंब्रिज येथे गेले. सन १९१५ ते १९२२ या काळात कलकत्ता विद्यापीठात पदार्थ विज्ञान या विषयाचे त्यांनी अध्यापन केले. १९२२ नंतर ते या विभागाचे प्रमुख झाले. इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटचे प्रमुख म्हणूनही सन १९३१ साली ते काम पाहत होते. १९४५-१९४८ या काळात कलकत्याच्या प्रेसिडेंसी कॉलेजचे प्राचार्य म्हणून त्यांनी काम पाहिले. १९४९ पासून भारत सरकारचे संख्याशास्त्रविषयक सल्लागार म्हणून ते काम पाहत असत. भारत सरकारच्या नियोजन मंडळाशीही यांचा संबंध होता. इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटचे ते अध्यक्ष होते. अनेक जागतिक संस्थांचे ते सभासद होते. १९४४ साली त्यांना ऑक्सफर्ड विद्यापिठाने वेल्डन पदक व पारितोषिक देऊन गौरव केला. १९५७ साली कलकत्ता विद्यापिठाचे सर्वाधिकारी पद त्यांना मिळाले. भारत सरकारने १९६८ मध्ये त्यांनी पद्मविभूषण हा किताब दिला. भारतीय सांख्यिकीय संशोधनात अग्रगण्य म्हणून मानण्यात येणारे 'संख्या' हे नियतकालीक १९३३ मध्ये त्यांनी सुरु केले आणि तेव्हापासून त्याचे सातत्याने संपादन करून आंतरराष्ट्रीय सांख्यिकीय क्षेत्रात त्याला मानाचे स्थान प्राप्त करून दिले. अशा अनेक सन्मान्य पदे व मानसन्मान मिळवलेल्या या श्रेष्ठ भारतीय संख्याशास्त्रज्ञाने २८ जून १९७२ रोजी या जगाचा निरोप घेतला.
मूल्ये
• कर्तव्यदक्षता, श्रमनिष्ठा, विज्ञाननिष्ठा
→ अन्य घटना
• प्रसिध्द साहित्यिक व समीक्षक थोर विचारवंत गंगाधर पानतावणे यांचा जन्म १९३७ कर्मवीर औंदुबर कोंडीबा पाटील स्मृतीदिन २०००
• भारत व पाकिस्तानमध्ये सिमला करार झाला - १९७२ रत्नप्रभादेवी मोहीते पाटील स्मृती - २००२
→ उपक्रम
• मराठीतील विज्ञान मासिकांची माहिती मिळवा
. • मराठीतील विज्ञान मासिकांचे वाचन करा.
→ समूहगान
• आम्ही बालक या देशाचे, शिकू घडे सारे विज्ञानाचे....
→ सामान्यज्ञान
- • माणसाला हसण्यासाठी १७ स्नायू वापरावे लागतात. पण रागावण्यासाठी ४३ स्नायू वापरावे लागतात. • जगात सर्वात जास्त वेगाने उडणारी चिमणी स्वीटर होय. तिचा वेग ताशी २०० मैल असतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा