5 जून दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः....
→ श्लोक
- सुगंधी एकही वृक्ष करी फुलुनि गंधित । साया राना, कुला जैसा शोभवी चांगला सुत || एखादा चांगला सुगंधी वृक्ष, जर फुलून आला तर, तो सारे रान सुगंधित करुन टाकतो. तद्वतच एक चांगला मुलगा सर्व कुलाला, सत्कीर्तिसुगंध देतो.
→ चिंतन
सुजल, सुफल, मलयजशीतल सस्यश्यामल अशी प्रिय मातृभूमी! ज्या प्रमाणे आपण आपले नातेवाईक, शेजारी, मित्र यांच्याशी प्रेमाने वागतो, त्यांना दुखवत नाही, त्यांची काळजी घेतो, अडचणीतून त्यांचे रक्षण करायला धावत जातो. तशी भावना आपल्या मनात वृक्ष आणि प्राणिमात्रांबद्दल निर्माण झाली पाहिजे. अशुध्द वायूचा नाश, पाऊस, जमिनीचे रक्षण अशी | कामे करून झाडे आपल्याला मदत करीत असतात. आपल्याला आरोग्य पाहिजे असेल तर आपण निसर्गनियमांचे पालन केले पाहिजे. पर्यावरणाच्या | संतुलनाकडे काटेकोर लक्ष दिले पाहिजे. वृक्षतोड, अपायकारक गोष्टींची चुकीची विल्हेवाट, प्रदूषण या गोष्टीबद्दल काळजी घेतली पाहिजे.
→ कचाकचन
'पर्यावरण' आज संपूर्ण विश्वात प्रदूषण या शब्दामुळे प्रत्येक माणूस असुरक्षित झाला आहे. हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, पाणी प्रदूषण, जमीन प्रदूषण सतत वाढत आहे. वाढती लोकसंख्या, वाढते प्रदूषण असे समीकरण तयार झाले आहे. निसर्ग आणि मानव यांचे नाते अतूट आहे. निसर्गाच्या मदतीनेच मानवाने नेत्रदिपक प्रगती केली आहे. परंतु मानवाच्या स्वार्थी स्वभावामुळे निसर्ग मानवाला ओळखून चुकला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस दुष्काळाचे तडाखे चटके मानवाला बसत आहेत. त्यासाठी मानवाने निसर्गाचे संतुलन राखणे ही काळाची गरज आहे. डॉ. स्वामीनाथन यांनी तर हरित आरोग्य पर्यटन केंद्राची कल्पना देशाला दिली. त्यांच्या कल्पनेप्रमाणे प्रत्येक माणसाने उपलब्ध पाण्याचा, सांडपाण्याचा वापर करून घराभोवती रिकाम्या जागेत, शालेय परिसरात, कारखाना परिसरात, फळांची, फुलांची, भाजीपाल्याची लागवड करावी जेणेकरून प्रत्येक ठिकाणी हे हरित आरोग्य पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास येईल. सांडपाण्याचा योग्य विनियोग होईल. फळे, भाजीपाला मिळून सकस अन्ननिर्मिती बरोबर हिरव्या वनस्पतींमुळे प्राणवायु सुध्दा निर्माण होईल. एका कामात दहा कामे पूर्ण होतील. उदा. सांडपाण्याची विल्हेवाट, डासांची निर्मिती होणार नाही, सांडपाण्यामुळे वृक्षांची लागवड, वृक्षांपासून फळे, प्राणवायु मिळेल अशाप्रकारे सांडपाण्यामुळे गटारे होऊन डास होणार नाहीत. पुढे मलेरिया किंवा रोगांचा प्रादुर्भाव तर थांबेलच उलट अन्न म्हणून सकस फळे व भाजीपाला उपलब्ध होईल. डॉ. स्वामीनाथन यांची हरित आरोग्य पर्यटन केंद्राची निर्मिती प्रत्येक ठिकाणी झाली पाहिजे. राळेगणसिद्धी येथे रुक्ष, ओसाड जंगलात समाजसेवक अण्णा हजारे यांनी 'पाणी अडवा, पाणी जिरवा' याप्रमाणे पाणी साठवण व पाणी वापर तंत्रज्ञान राबविले. त्यामुळे आज तेथील जनजीवन समृध्द झाले आहे. त्याचप्रमाणे आज बारामती कृषी प्रतिष्ठान जगात प्रसिध्द आहे. मा. शरदरावजी पवार यांनी वयाच्या १७ व्या वर्षी बारामती परिसरात ३०० पाझर तलाव केले. आज जगातील सर्व क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान त्यांनी बारामती परिसरात वापरले. जैविक तंत्रज्ञाने, कुक्कटपालन, बकरीपालन, साखर कारखाना, इ.टी. एच. असो. या सर्व बाबी अत्याधुनिक स्वरूपात पवार साहेबांनी स्वतःच्या परिसरात अवलंबिल्या आहेत. 'आधी केले मग सांगितले ' याप्रमाणे प्रत्येक कार्यक्रम शास्त्रशुध्द तऱ्हेने प्रत्यक्षात राबवून प्रत्येकाच्या घरात समृध्वीची गंगा | निर्माण केली. ही समृध्दीची गंगा प्रत्येकाने अंगीकारावी. पाणी साठवण, पाणी वापर, वृक्षसंवर्धन, वृक्षलागवड, हरित आरोग्य पर्यटन केंद्र यासारखे विविध उपक्रम प्रत्येकाने स्वतःहून राबविल्यास प्रत्येक कुटुंब सुखी कुटुंब, समृध्द कुटुंब झाल्याशिवाय राहणार नाही. संपूर्ण परिसर प्रदूषण मुक्त तर होईलच त्याचबरोबर प्रत्येकाच्या घरात सुख, शांती व समाधान नांदू शकेल. यासाठी प्रत्येकाने जमीन, पाणी, हवा, अग्नी व आकाश या पाच नैर्सगिक शक्तींचा अचूक व योग्य गतीने वापर करुन पर्यावरणाचा मानवी कल्याणासाठी वापर करावा, पर्यावरणाचे संतुलन, समतोल, संवर्धन ही काळाची गरज आहे..
→ सुविचार
'वृक्ष लावा, वृक्ष जगवा'
• 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे साजरे.
दिनविशेष
• विश्वपर्यावरण दिवस - १९७२ : पर्यावरणाचा समतोल कायम राहावा व त्यासाठी जनजागृती व्हावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो. ५ जून १९७२ रोजी स्टॉकहोम येथे 'मानवी जीवन व पर्यावरण' यांचा विचार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती. १३० राष्ट्रांचे प्रतिनिधी त्यात सहभागी झाले होते. पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवताली जे जे काही दिसते ते पर्यावरण. सजीव निर्जीव, हवा, पाणी, जमीन यांचा | देखील समावेश आहे. पर्यावरण मोहिमेत सर्वांचा सहभाग जरूरीचा आहे. मूलतः निसर्गाची योजना मानवाने अन्य जीवसृष्टीसह शांतता टिकवून राहावे। अशी आहे. परंतु वाढते औद्योगिकीकरण, शहरांची वाढ, निसर्गावर वाढते अतिक्रमण यामुळे पर्यावरण समतोल ढासळत आहे. ही जाणीव निर्माण करण्यासाठीच हा दिन पाळला जातो
→ अन्य घटना
• जगप्रसिध्द अर्थशास्त्रज्ञ अॅडम स्मिथ यांचा जन्म १७२३
• प्रसिध्द हार्मोनियम वादक, संगीतकार व नट गोविंदराव टेंबे यांचा जन्म - १८८१
• क्रांतिकारक उधमसिंहास फाशी- १९४० अमेरिकन कृषितज्ज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचा स्मृतिदिन - १९४३
• डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कोलंबिया विद्यापीठाने 'डॉक्टर ऑफ लॉज' ही पदवी दिली- १९५२ झरतुष्ट जन्मदिन १९६७ पासून आठ वर्षे वाहतुकीसाठी बंद असलेला 'सुवेझ' कालवा पुन्हा आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी खुला करण्यात आला १९७५
• प्रसिध्द इतिहास संशोधक ग.ह. खरे यांचे निधन - १९८५ • त्रिशूल शेपणास्त्राची यशस्वी चाचणी- १९८९
→ मूल्ये
• निसर्गप्रेम, भूतदया.
→ उपक्रम -
• आपल्या जवळच्या माळरानावर झाडे लावा. •तुमच्या आसपासच्या झाडांचे औषधी उपयोग समजावून घ्या.
> समूहगान
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे....
→ सामान्यज्ञान
• मानवी वस्ती सगळीकडे पसरू लागल्यानंतर जंगल - रानात वा वनात राहणाऱ्या प्राण्यांनी कुठे जायचे या समस्येतून अभयारण्याचा उपाय सापडला व जगभर अभयारण्ये राखण्यास, जतन करण्यास सुरूवात झाली. अमेरिकेतील यलोस्टोन येथील अभयारण्य हे जगातील पहिले | अभयारण्य. भारतातही अभयारण्ये राखून जंगल व वनस्पतीचे संरक्षण करण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिका, केनिया, झांबिया, टांगानिका येथील अभयारण्ये जगप्रसिध्द आहेत. ब्रिटनमध्ये नैसर्गिक तळी व जंगले सुस्थितीत राखली जातात. जपानमध्ये वनांची मुद्दाम निगा राखली जाते. | फिनलंड या छोट्या देशात अभयारण्य आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा