9 जून दैनंदिन शालेय परिपाठ
→ प्रार्थना
खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अपवि....
→ श्लोक
विद्या ददाति विनयं, विनयाद् याति पात्रताम् । पात्रत्वान् धनमाप्नोति, धनाद् धर्म ततः सुखम्।।
विद्या विनय (नम्रता) देते, विनयामुळे पात्रता (योग्यता) येते. पात्रता आल्याने (योग्यता वाढल्याने) धन प्राप्त होते. धनामुळे धर्म वाढतो आणि धर्मातून सुखाचा लाभ होतो.
→ चिंतन
- गरज ही शोधाची जननी मानतात. मानवाच्या विकासाच्या काळात जसजशी सुधारणा होत गेली तसतशा त्याच्या गरजाही वाढत गेल्या. सुरुवातीस तो कंदमुळे खाऊन, झाडाची वल्कले गुंडाळून अल्पसंतुष्टपणे राहत होता. पण बदलत्या काळाबरोबर त्याला नव्यानव्या गोष्टींची जरूरी भासू लागली व त्या मिळविण्यासाठी तो धडपडू लागला आणि या धडपडीत वेगवेगळे शोध लागत गेले. अग्नीची वेगवगळी रूपे, घराच्या बदलत्या सुखसोयी, वस्त्रांचे विविध प्रकार अशा गरजांतून निर्माण झाले. गरज लागल्यावर माणूस शोध घेतो, अन्नाच्या वेगवेगळ्या जाती शोधून काढतो. हे सर्व आधुनिक जग माणसाच्या गरजांतूनच निर्माण झाले आहे.
कथाकथन -
कांतिकारी महानायक बिरसा मुंडा इंग्रजी राजवटीत आदिवासीचा न्यायहक्क त्यांच्यापासून हिरावून घेण्यात आला होता. अन्यायाविरुद्ध आवाज काढणान्या आदिवासीच्या जिमा कापल्या जात होत्या. आया-बहिणींच्या अब्रूचे धिंडवडे काढले जात होते. सतत अन्याय, अत्याचार, हिंसा आणि शोषण होत होते. तेव्हा आपल्या आदिवासी समाजास संघटित करण्यासाठी व त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी वरील उद्गार काढले आहेत, एका महान क्रांतिकारकामे आणि त्याचे नाव आहे बिरसा मुंडा! बिरसा मुंडा या महान क्रांतिकारकाचा जन्म १५ नोव्हेंबर १८७७ मध्ये झारखंड मधील संची जिल्ह्यातील अहात नावाच्या गावामध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सुगना मुंडा आणि आईचे नाव करमी हातू होते. आदिवासी समाजात जन्माला आलेल्या बिरसा मुंडाचे प्राथमिक शिक्षण बिरजू मिशन स्कूलमधून झाले. उच्च प्राथमिक परीक्षा सन १८८७ मध्ये जी.ई.एल. मिडल स्कूलमधून उत्तीर्ण केली. ब्रिटीश प्रशासनात मुंडा आदिवासीची नोंद चोर, डाकू, लुटारू म्हणून केली जायची; त्यामुळे त्यांना न्याय मिळत नव्हता. अधिकारी वर्ग त्यांचे शोषण करीत असे. हे सर्व अत्याचार सुशिक्षित बिरसा मुंडा उघड्या डोळ्यांनी पाहत होता. इ.स १८६९ चा 'वनसंरक्षण कायदा' निघाला; तत्पूर्वी आदिवासींचे जगणे, आदिवासींच्या उपजीविकेस वनांची मदत व्हायची, त्यावरही बंदी आणली गेली. हे अन्याय, अत्याचार सहन न झाल्याने १८९० मध्ये बिरसा मुंडाने स्वातंत्र्यासाठी इंग्रजाविरुद्ध एक सशस्त्र संघटना उभी केली. १८९८ च्या फेब्रुवारी महिन्यात गोंडवनातील एका सभेमध्ये बिरसाने आपल्याच कुन्हाडीने आपलाच हात कापून त्या रक्ताने आदिवासी बांधवाच्या कपाळावर टिळे लावले आणि संकल्प करवून घेतला, की, जोपर्यंत आपल्या आयाबहिणींच्या इज्जतीचा बदला आपण घेत नाही, तोपर्यंत आपण चूपचाप सायचे नाही. आपल्या सशस्त्र लढ्यास प्रारंभ करण्यापूर्वी बिरसाने आपल्या अनुयायांसोबत रांचीजवळील चुटिया |मंदिराला भेट देण्याचे ठरविले. आदिवासी मुंडात आपल्या श्रध्दा स्थानाबाबत जागृती करून आपल्या परंपरांबद्दल आदर आणि आस्था निर्माण करण्यासाठी ती भेट होती. चुटिया मंदिराबाबत मुंडाचे असे मत होते की, या आदिवासींच्या मालकीच्या जागेवर आर्य-हिंदूनी ताबा मिळवून त्यात थोडाफार बदल करून मंदिराची निर्मिती केली. आदिवासींची संस्कृती जिवंत ठेवायची असेल तर त्यांच्या मनावर असलेली इतर धर्मांची पुटे काढावी लागतील. त्याशिवाय मुंडामध्ये जागृती होणार नाही. म्हणूनच बिरसाने या मंदिरातील हिंदू देवतांच्या मूर्ती नष्ट केल्या आणि त्याने आपल्या समाज बांधवांना समजावून सांगितले की, | आदिवासी समाजाच्या दुःखाला आणि पतनाला आर्य हिंदू कारणीभूत आहेत. त्यामुळे त्यांना भिरकावून द्या आणि आपल्या मूळ संस्कृतीनुसार आचरण करा. आदिवासीचे पूर्वज हे भारतातील शासक होते. त्या वेळी आदिवासी समाजात एकता होती. समाज सुखी व समाधानी होता. परंतु पुढे आर्यांनी भारतात आगमन। करून आदिवासींच्या जमिनीवर ताबा मिळवला आणि त्यांची मूळ संस्कृतीच नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू केला. बिरसा व मुंडा आदिवासी आनंदात राहत असल्याने इंग्रज सरकार व पोलिस यंत्रणेची झोप उडाली होती. ढोमवारी गावात सामूहिक हत्या आणि बलात्काराचे तांडव केले. या हत्याकांडात बिरसाची | अनेक विश्वासू माणसं मारली गेलीत. या प्रकारामुळे मुंडाच्या लढ्यास हादरा बसला असल्या नीच कृत्यामुळे बिरसाही हतबल होऊन परिहट येथील घनदाट | जंगलात निघून गेला. यातच बिरसा मुंडा पोलिसांच्या हाती लागला. त्यांला तुरूंगात डांबले गेले. स्वातंत्र्यप्रिय बिरसाला तुरुंगातले वातावरण मानवले नाही. त्यांने अन्नपाणी सोडले. ९ जून १९०० ला सकाळी बिरसाने शेवटचा श्वास घेतला.
सुविचार
• चांगुलपणाबरोबर शीर्य, वीरत्व व शान हवे, तरच संगतीची वाईट माणसे चांगली बनतात.
• सर्वाच्या हिताचे कल्याणाचे जे असेल ते करावे.
→ दिनविशेष
• जॉर्ज स्टीफन्सन जन्मदिन - १७८१ : १८२५ मध्ये जगातील पहिली आगगाडी तयार करण्याचा मान मिळविला एका ब्रिटीश इंजिनीयरने! जॉर्ज स्टीफन्सन हे त्याचे नाव, गरिबीतून याने कसेबसे स्वकष्टाने शिक्षण घेतले. ज्या खाणीत त्याचे वडील इंजिनवर काम करीत होते तिथेच तो असिस्टंट फायरमन म्हणून काम करु लागला. रिकाम्या वेळात त्याने इंजिन या विषयावरचे सर्व ग्रंथ वाचून काढले. खाणीतील इंजिनात सुधारणा करुन जॉर्जने १८१४ मध्ये ताशी ४ मैल वेगाणे जाणारे इंजिन तयार केले. त्याची हुशारी पाहून खाणमालकाने त्याच्या उपक्रमास पैसे पुरवायचे ठरविले. वाफेच्या इंजिनामध्ये कोळसा प्रखरपणे जळण्यासाठी हवेच्या जोरदार प्रवाहाची आवश्यकता आहे. त्यासाठी नवीन मार्ग शोधून काढणे जरूरी आहे, असे त्याला वाटू लागले. याचवेळी स्टोक्टन व डालींग्टन या गावांना कोळसा वाहून नेण्यासाठी स्टिफन्सने आपल्या इंजिनाचा विचार मांडला. या दोन गावांमध्ये १ मैलाचा | रेल्वेमार्ग बांधला गेला. १८२५ च्या सप्टेंबर महिन्यात या मार्गावरुन उतारू घेऊन जाणाऱ्या गाडीचा पहिला प्रयोग झाला. नवनवे बदल होत आजचे इंजिन तयार झाले. १८२९ सालची लिव्हरपूल मँचेस्टर आगगाडीची स्पर्धा याने जिंकली. १८४८ मध्ये १२ ऑगस्टला जॉर्ज स्टीफन्सनचे निधन झाले
. → मूल्ये
• श्रमनिष्ठा, विज्ञाननिष्ठा, कर्तव्यदक्षता.
→ अन्य घटना
• गिरणी कामगारांची रविवारच्या साप्ताहिक सुट्टीची मागणी दिन मान्य होऊन साप्ताहिक सुट्टीची सुरुवात झाली. - १८९० लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. - १९६४ क्रांतीकारी शहिद बिरसा मुंडा स्मृती-१९००
•केंद्रीय रेल्वेमंत्री लालु प्रसाद यादव जन्मदिन - १९४८
→ उपक्रम
• विविध शास्त्रज्ञांच्या शोधकार्याचा एक तक्ता तयार करा. वेगवान आगगाड्यांची माहिती मिळवा.
→ समूहगान
• जय भारता, जय भारता, जय भारती जनदेवता.....
→ सामान्यज्ञान
• घरबांधणीसाठी वापरल्या जाणाऱ्या ९" x ४ X २, " विटेच्या आकाराची सोन्याची वीट केली तर ती सुमारे ३२ किलो भरेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा